दाल फ्रायला लसणाचा नव्हे तर चक्क सोन्याचा तडका, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 06:44 AM2024-02-01T06:44:35+5:302024-02-01T06:45:08+5:30

Jara Hatke News: दालप्रेमींना लसूण आणि मिरचीचा तडका दिलेली डाळ दिली की इतर पदार्थ त्यांच्यासाठी गौण ठरतात. दुबईमध्ये लसणाची नव्हे तर २४ कॅरेट सोन्याची फोडणी घातलेली ‘दाल फ्राय’ मिळत असल्याने ती चर्चेत आली आहे.

The dal fry has a golden crunch, not garlic, price... | दाल फ्रायला लसणाचा नव्हे तर चक्क सोन्याचा तडका, किंमत...

दाल फ्रायला लसणाचा नव्हे तर चक्क सोन्याचा तडका, किंमत...

दालप्रेमींना लसूण आणि मिरचीचा तडका दिलेली डाळ दिली की इतर पदार्थ त्यांच्यासाठी गौण ठरतात. दुबईमध्ये लसणाची नव्हे तर २४ कॅरेट सोन्याची फोडणी घातलेली ‘दाल फ्राय’ मिळत असल्याने ती चर्चेत आली आहे.

दुबईमध्ये ‘२४ कॅरेट गोल्ड दाल फ्राय’ ही डीश सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. इन्स्टाग्रामवर मि. रेडमन नावाच्या एका चॅनलने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या दाळीवर लसणाची नव्हे तर चक्क २४ कॅरेट सोन्याची फोडणी दिली जाते. या एक वाटी दालफ्रायची किंमत तब्बल २५ हजार रुपये इतकी आहे. दुबईतील बुर्ज अल अरब या रेस्टॉरंटमध्ये ही डाळ देण्यात येते. येथे फक्त डाळच नाही तर इतर पदार्थही दिले जातात. येथे इंटेरिअर डिझायनिंगमध्येही सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. याशिवाय कॉकटेल, कॅपुचिनो, बर्गर आणि इतर अनेक पदार्थांमध्ये सोन्याचा वापर करण्यात येतो.

Web Title: The dal fry has a golden crunch, not garlic, price...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.