६ वर्ष स्वत:च्या भावालाच डेट करत होती युवती; DNA चाचणीनं पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:15 PM2023-04-22T22:15:39+5:302023-04-22T22:16:17+5:30

एका युवतीने रेडिटवर ऑनलाईन पोस्ट केलीय, ती सध्या व्हायरल झाली आहे.

The girl was dating her own brother for 6 years; DNA testing Shocking Report | ६ वर्ष स्वत:च्या भावालाच डेट करत होती युवती; DNA चाचणीनं पायाखालची जमीन सरकली

६ वर्ष स्वत:च्या भावालाच डेट करत होती युवती; DNA चाचणीनं पायाखालची जमीन सरकली

googlenewsNext

आपण प्रेम कहाणी अनेकांची ऐकली असेल. परंतु काही कहाणी कायम आठवणीत राहतात. अलीकडेच एक लवस्टोरी समोर आली आहे ज्याबाबत महिलेने तिच्या लाईफबाबत सांगितले. ती युवती ज्या मुलाला गेल्या ६ वर्षापासून डेट करत होती तोच मुलगा तिचा बायोलॉजिकल ब्रदर असल्याचं समोर आले. DNA चाचणीनंतर ही धक्कादायक बाब युवतीला कळाली. हे प्रकरण खूप शॉकिंग आहे अब्जावधी लोकांमध्ये तोच मुलगा तिचा भाऊ कसा निघाला, याबाबत मुलगी काय म्हणते? हे जाणून घेऊया. 

Dailystar नुसार, एका युवतीने रेडिटवर ऑनलाईन पोस्ट केलीय. त्यात म्हटलंय की, मी ६ वर्षापासून एका मुलाला डेट करत होती पण आता तोच माझा बायोलॉजिकल भाऊ निघाला. माझे वय ३० वर्ष आणि माझ्या बॉयफ्रेंडचे वय ३२ वर्ष आहे. मला एका कुटुंबाने दत्तक घेतले होते. मी माझं शिक्षण पूर्ण करत होती तोवर मला याची काहीच कल्पना नव्हती. माझा बॉयफ्रेंड हादेखील दत्तक पुत्र आहे. आमच्यात ही कॉमन गोष्ट असल्याने आम्ही दोघे चांगले मित्र झालो. एकमेकांसोबत वेळ घालवू लागलो. आम्हाला एकत्र राहणे चांगले वाटत होते. 

युवतीने पुढे सांगितले की, आम्हाला दोघांना चांगल्या फॅमिलीने दत्तक घेतले होते. आमचे रिलेशन खूप मस्त चालले होते. माझ्या बॉयफ्रेंडशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कुणीही नाही. मी त्याच्यासोबत आयुष्य जगण्याचा आनंद घेत होती. रिलेशनशिपपासून रोमान्सपर्यंत सर्व क्षण आम्ही अनुभवले. अनेकदा आम्ही दोघे एकसारखेच दिसतो असं लोकं म्हणायची तेव्हा मला खूप आनंद व्हायचा असं तिने म्हटलं. 

'असा' झाला खुलासा 
लोक आम्हाला सारखं असं म्हणायची म्हणून मी उत्सुकतेने दोघांची DNA चाचणी केली. परंतु जेव्हा या चाचणीचा रिपोर्ट समोर आला तेव्हा मला धक्काच बसला. DNA रिपोर्टमध्ये बॉयफ्रेंड माझा बायोलॉजिकल भाऊच निघाला. मी अद्याप हे त्यालाही सांगितले नाही. परंतु मला काही करायचे सुचत नाही. मला वाटते तो रिपोर्ट चुकीचा असेल. 

DNA चाचणी काय असते?
डीएनए चाचणीला अनुवांशिक चाचणी देखील म्हटले जाऊ शकते. ही एक प्रकारची चाचणी आहे जी शरीरातील जीन्स, क्रोमोसोम किंवा प्रथिनांमधील बदल ओळखू शकते. अनुवांशिक चाचणी रक्त, त्वचा, केस, ऊतक किंवा अम्नीओटिक द्रवपदार्थाच्या नमुन्याद्वारे केली जाऊ शकते. डीएनए चाचणी तुम्हाला तुम्ही कोण आहात हे ठरवणार्‍या जनुकांबद्दल बरीच माहिती देऊ शकते. डीएनए चाचणी तुम्हाला विशिष्ट आजार आहे की नाही याची पुष्टी करू शकते.
 

Web Title: The girl was dating her own brother for 6 years; DNA testing Shocking Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.