अनेक वर्षांपासून बंद होतं घर, प्रवेश करताच युवकाला बसला धक्का! सांगितला कसा होता आतला नजारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 12:09 PM2023-04-23T12:09:15+5:302023-04-23T12:22:17+5:30
या घरात जेव्हा एका युवकाने प्रवेश केला, तेव्हा त्याच्या पायाखालची मातीच सरकली. या व्यक्तीने सांगितले की, त्याने घरात जे काही पाहिले ते अत्यंत भयावह होते.
अनेक वेळा जुन्या आणि बंद पडलेल्या घरांमध्ये काही ना काही भयंकर गोष्टी सापडतात. ज्या पाहून लोक भयभीत तर होतातच, शिवाय अनेक प्रश्नही निर्माण होतात. अशाच एका घरात नुकत्याच काही विचित्र आणि भयंकर गोष्टी सापडल्या आहेत. ज्या पाहून कुणाच्याही अंगावर शहारा उभा राहील. या घरात जेव्हा एका युवकाने प्रवेश केला, तेव्हा त्याच्या पायाखालची मातीच सरकली. या व्यक्तीने सांगितले की, त्याने घरात जे काही पाहिले ते अत्यंत भयावह होते.
सॅड फेस असलेला विंटेज जोकर आणि अर्थवट बाहुली -
खरे तर, 48 वर्षीय प्रोफेशनल अर्बन एक्सप्लोरर डेव्ह यांना त्यांच्या फेसबुक फॉलोअरच्या माध्यमाने कॅनडातील टोरंटो येथील एका उजाड घराची माहिती मिळाली. जेव्हा Freaktography नावाने ओळखले जाणारे डेव्ह तेथे पोहोचले, तेव्हा संपूर्ण घरात विचित्र बाहुल्या आणि काही अर्धवट बाहुल्या दिसल्या. याशिवाय तेथे एक सॅड फेस असलेला विंटेज जोकरही होता. जो विह्स्कीच्या रिकाम्या बाटलीजवळ ठेवण्यात आला होता.
घरात पसरले होते बाहुल्यांचे तुटलेले हातपाय -
मिळालेल्या माहितीनुसार, या घरात काही वर्षांपूर्वी एक महिला राहत होती. या महिलेने घरात प्लॅस्टिक आणि कापडी बाहुल्यांचा संग्रह करून ठेवला होता. यांपैकी बहुतेक बाहुल्या तिने स्वतःच तयार केलेल्या होत्या. या घरभर सर्वत्र बाहुल्यांचे तुकडे पडलेले होते. यात चेहरा, डोळे, हात-पाय आणि केस आदींचा समावेश होता. काही ठिकाणी अनेक बाहुल्या एकत्रित ठेवण्यात आलेल्या आहेत. किचनमध्ये भांड्यांचे अर्धवट पॅकिंग आणि सिंक मध्ये अनेक वर्षांपासून खराब भांडी पडलेली होती.
धूळ खात असलेले टाइपरायटर आणि एक पियानो -
जेव्हा डेव्ह घरात गेले तेव्हा त्यांना एका सॅड फेस असलेल्या जोकरसमोर त्याच्याच साईजचा एक छोटा पियानोही दिसला. असे वाटत होते, की तो त्यालाच वाजवण्यासाठी ठेवला आहे. याठिकाणी एख धूळ खात असलेला टाईपरायटरही होता. एवढेच नाही, तर अशा अनेक भीतीदायक गोष्टी तेथे होत्या.
यासंदर्भात डेव्ह म्हणाले, मला दोन तीन वर्षांपूर्वी कुणी तरी या घरासंदर्भात माहिती दिली होती. पण मी त्याकडे दूर्लक्ष करत येथे येणे टाळले होते, ही माझी चूक होती. मला यासंदर्भात माहिती मिळताच मी येथे यायला हवे होते. यानंतर माझ्या काही मित्रांनी मला यासंदर्भात काही फोटो पाठवले तेव्हा मी येथे आलो. डेव्ह यांनी, या घराचा एक व्हडिओ टिकटॉक आणि इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.