पती-पत्नीच्या भांडणाचं अजब कारण, पत्नी रोज दारू पिते आणि पतीलाही पाजते!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:11 PM2024-10-21T16:11:16+5:302024-10-21T16:12:09+5:30

कौटुंबिक समुपदेशन केंद्रात सुरू असलेल्या एका केसमध्ये पती-पत्नीच्या भांडणाचं कारण ऐकून सगळेच हैराण झाले. 

The husband fed up with his wife's daily alcohol drinking, said - she forces me too! | पती-पत्नीच्या भांडणाचं अजब कारण, पत्नी रोज दारू पिते आणि पतीलाही पाजते!

पती-पत्नीच्या भांडणाचं अजब कारण, पत्नी रोज दारू पिते आणि पतीलाही पाजते!

पती-पत्नीच्या वादाच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. कधी पती गुटखा खाण्याऱ्या पत्नीला वैतागलेले असतात, तर कधी चिप्स खाणाऱ्या. आता तर उत्तर प्रदेशच्या झांसीमधून आणखी एक घटना समोर आली आहे. येथील कौटुंबिक समुपदेशन केंद्रात सुरू असलेल्या एका केसमध्ये पती-पत्नीच्या भांडणाचं कारण ऐकून सगळेच हैराण झाले. 

news18.com ने दिलेल्या एका वृत्तानुसार, इथे एका व्यक्तीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी स्व:ताही दारू पिते आणि त्यालाही जबरदस्तीने पाजते. पत्नीच्या या जबरदस्तीला कंटाळून पतीने पत्नीला माहेर सोडलं होतं. पत्नीने जेव्हा याबाबत तक्रार केली तेव्हा पोलिसांनी पत्नी-पत्नीला कौंटुबिक समुपदेशन केंद्रात पाठवलं.

येथील काउन्सेलरनुसार, पती-पत्नीची जेव्हा काउन्सेलिंग झाली तेव्हाही त्यांच्यात वाद झाला होता. पतीने आरोप केला की, पत्नी रोज दारू पिते आणि त्यालाही जबरदस्तीने पाजते. पतीचं म्हणणं आहे की, तो रोज रोज दारू पिऊ शकत नाही. पण पत्नी रोज दारू पिण्यासाठी जबरदस्ती करते. पतीने आरोप केला की, पत्नी एकाच वेळी तीन ते चार पेग दारू पिते. त्याला दारू पिणं अजिबात आवडत नाही. हैराण करणारी बाब म्हणजे पत्नीने सगळे आरोप मान्य केले आहेत.

पतीने सांगितलं की, दोन महिन्यांआधी त्याचं लग्न झालं होतं. पहिल्याच रात्री तिने दारू पिण्याचा विषय काढला. त्यानंतर रोज दारू पित होता आणि त्यालाही जबरदस्तीने देत होती. तो पत्नीच्या दारू पिण्याला कंटाळला होता. त्यामुळे त्याने तिला माहेरी सोडलं. सध्या काउन्सेलरने पती-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना समजावलं आहे. त्यानंतर पती-पत्नी सोबत राहण्यास तयार झाले.

Web Title: The husband fed up with his wife's daily alcohol drinking, said - she forces me too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.