गोष्ट तिसऱ्या लग्नाची...दोन पत्नींनी मिळून लावलं पतीचं तिसरं लग्न, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 02:51 PM2024-07-02T14:51:27+5:302024-07-02T14:52:23+5:30
सध्या एक अशी घटना समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीला आधीच पत्नी होत्या आणि या दोघींनी मिळून पतीचं तिसरं लग्न लावून दिलं.
अनेकदा एकाच व्यक्तीला अनेक पत्नी असल्याच्या घटना समोर येत असतात. या घटना कधी हैराण करणाऱ्या तर कधी विचारात पाडणाऱ्या असतात. पतीने दुसरं लग्न केलं तर अनेकदा पहिली पत्नी घर डोक्यावर घेते तर कधी पतीला सोडते. पण सध्या एक अशी घटना समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीला आधीच पत्नी होत्या आणि या दोघींनी मिळून पतीचं तिसरं लग्न लावून दिलं.
hindi.news18.com च्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील ही घटना आहे. इथ एका महिलेने तिच्या पतीच्या आधीच्या दोन्ही पत्नींना स्वीकारून लग्न केलं आहे. सगेनी पांडन्ना नावाच्या व्यक्तीने दोन हजार सालात पर्वतम्मा नावाच्या महिलेसोबत लग्न केलं. त्यानंतर सात वर्षानी त्याने अप्पलम्मा महिलेसोबत लग्न केलं. कारण आधीच्या पत्नीपासून त्याला अपत्य झालं नाही.
तीन बायका, एक पती...
सगेनी पांडन्नाने पर्वतम्मानंतर अप्पलम्मासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलही झालं. पण त्यानंतर त्यांना आणखी एक बाळ हवं होतं. अशात पर्वतम्मा आणि अप्पलम्मा दोघींनी मिळून आपल्या पतीचं तिसरं लग्न लावलं. पंडन्नाने आपल्या दोन्ही पत्नींना सांगितलं होतं की, त्याला किल्लमकोटा गावातील लाव्या उर्फ लक्ष्मी नावाची तरूणी पसंत आहे.
गोष्ट तिसऱ्या लग्नाची...
महत्वाची बाब म्हणजे तिसरी महिला लव्याच्या घरातील वयोवृद्धही या लग्नासाठी तयार झाले. पंडन्नाच्या दोन्ही बायकांनी लग्नाच्या पत्रिका छापल्या. ज्यात लिहिलं होतं की, तुम्हाला आमच्या पती लग्नात आमंत्रित करण्यात येत आहे. तिसरं लग्न २५ जून रोजी पार पडलं. लग्नात भरपूर पाहुणेही आले होते.
किल्लमकोटा गावातील लोकांनुसार, पंडन्नाकडे काही जमीन आहे आणि तो मजुरीची कामेही करतो. त्याच्या दोन्ही पत्नीही त्याला मदत करतात. लोक म्हणाले की, “पर्वतम्मा आणि अप्पालम्मा दोघींनी त्यांना सांगितलं की, यात चुकीचं काय आहे? आम्ही दोघी पंडन्नासोबत सुखाने राहत आहोत. आम्हाला आणखी एक बाळ हवं आहे. ते आमच्या दोन्हीपैकी कुणी देऊ शकत नव्हतं. त्यामुळे आम्ही आमच्या पतीचं तिसरं लग्न लव्यासोबत लावलं".