रात्री झोपली अन् थेट ९ वर्षांपर्यंत झोपूनच होती ही मुलगी, उठली तेव्हा आईचा झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 11:17 AM2022-04-06T11:17:54+5:302022-04-06T11:18:22+5:30
Sleeping Girl Ellen Sadler: Medium Dot Com च्या रिपोर्टनुसार, १५ मे १८५९ मध्ये इंग्लंडमध्ये एलेन सॅंडलर (Ellen Sadler) नावाच्या या मुलीने जन्म घेतला होता.
Sleeping Girl Ellen Sadler: जगभरात सतत विचित्र अशा घटना घडत असतात. ज्यांवर सहजासहजी विश्वास ठेवता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आश्चर्यकारक करणाऱ्या घटनेबाबत सांगणार आहोत. ही घटना एका मुलसोबत घडली होती. ब्रिटनमध्ये साधारण १५० वर्षाआधी एका मुलीने जन्म घेतला होता, तिने तिच्या झोपेने जगभरातील लोकांना हैराण केलं होतं. ही मुलगी एका रात्री अशी काही झोपली की, ९ वर्षांपर्यंत झोपेतून उठलीच नाही.
Medium Dot Com च्या रिपोर्टनुसार, १५ मे १८५९ मध्ये इंग्लंडमध्ये एलेन सॅंडलर (Ellen Sadler) नावाच्या या मुलीने जन्म घेतला होता. या मुलीला एकूण १२ भाऊ-बहिणी होत्या. मुलीचा परिवार टर्विले नावाच्या गावात राहत होता. हे गाव ऑक्सफोर्ड आणि बंकिघमशायरच्या मधोमध आहे. या मुलीच्या जन्मावेळी सगळं काही ठीक होतं. पण जेव्हा ही मुलगी १२ वर्षांची झाली तेव्हा एका रात्री तिला एक अजब आजार झाला. या आजारामुळे जगभरातील डॉक्टर हैराण झाले होते.
मुलीच्या वडिलांचा मृत्यू बालपणीच झाला होता. यानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केलं होतं. २९ मार्च १८७१ ला एलेन आपल्या भावा-बहिणींसोबत रोजप्रमाणे झोपायला गेली. सकाळी घरातील सगळे लोक उठले, पण एलेन झोपेतून उठलीच नाही. घरातील लोकांनी तिला वेगवेगळ्या प्रकारे झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न केला. तिच्या अंगावर पाणी टाकलं. पण ती काही उठली नाही.
यानंतर घरातील लोकांना वाटलं की, तिचा मृत्यू झाला. पण तिची पल्स सुरू होती. त्यानंतर तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी पाहिलं की, मुलगी शीतनिद्रेत गेली आहे. बरेच प्रयत्न करूनही डॉक्टरांच्या हाती काही लागलं नाही. डॉक्टरांना समजू शकलं नाही की हा आजार काय आहे. काही दिवसात पूर्ण ब्रिटनमध्ये एलेनची बातमी पसरली. सगळीकडे तिची चर्चा होऊ लागली होती. बरेच लोक तिला बघायला येत होते. लोक पैसे देऊन तिला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न करत होते. घरातील लोकांनीही पैसे घेतले. पण एलेन काही जागी झाली नाही.
मुलीला जिवंत ठेवण्यासाठी तिची आई तिला दलिया, दूध पाजत होती. हे करता करता ९ वर्षे गेली आणि एक दिवस मुलीच्या आईचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. आईच्या मृत्यूच्या ५ महिन्यांनंतर एक दिवस चमत्कार झाला आणि ती ९ वर्षांनी झोपेतून जागी झाली. जेव्हा ती झोपली होती तेव्हा ती १२ वर्षांची होती आणि झोपेतून जागी झाली तेव्हा ती २१ वर्षांची होती. पण ती जागी झाली तेव्हा तिची आई जिवंत नव्हती.