पृथ्वीवरील एकमेव ठिकाण, जिथून दिसतं भविष्य, पण माणसांना जाण्यास आहे सक्त मनाई, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:55 IST2025-04-15T14:55:23+5:302025-04-15T14:55:54+5:30
Jara Hatke News: टाइम ट्रॅव्हलसारखी मानवी कल्पना अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. सध्यातरी काळाच्या पुढे किंवा मागे जाणं माणसांना शक्य झालेलं नाही. दरम्यान, पृथ्वीवर अशी एक जागा आहे जिथून टाइम ट्रॅव्हल करणं शक्य आहे. येथून तुम्ही भविष्य पाहू शकता आणि माघारी फिरू शकता.

पृथ्वीवरील एकमेव ठिकाण, जिथून दिसतं भविष्य, पण माणसांना जाण्यास आहे सक्त मनाई, कारण काय?
मानवाने मागच्या शतकभरात विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यामधून अफाट माहिती मिळवून नवनवे शोध लावून भौतिक जीवन सुखी केले आहे. मात्र टाइम ट्रॅव्हलसारखी मानवी कल्पना अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. सध्यातरी काळाच्या पुढे किंवा मागे जाणं माणसांना शक्य झालेलं नाही. दरम्यान, पृथ्वीवर अशी एक जागा आहे जिथून टाइम ट्रॅव्हल करणं किंचित शक्य वाटतं. येथून तुम्ही भविष्य पाहू शकता आणि माघारी फिरू शकता. मात्र हा काही नव्याने लागलेला शोध नाही. तर पृथ्वी हजारो वर्षांपासून हे ठिकाण अस्तित्वात आहे. या जागेचं नाव आहे डियोमेड बेट.
डियोमेड बेट खूपच खास असून, ते दोन भागात विभागलेलं आहे. बिग डियोमेड आणि लिटिल डियोमेड. हे दोन्ही भाग केवळ ४.८ किमी अंतरावर आहेत.मात्र हे छोटंसं अंतर तुम्हाला भूतकाळापासून भविष्यकाळापर्यंतचा प्रवास घडवू शकतं. त्याचं कारण म्हणजे ही दोन्ही बेटांच्या मधून आंतरराष्ट्रीय तिथी रेषा जाते. त्यामुळे या दोन्ही बेटांमधील वेळेत तब्बल एक दिवसाचं अंतर असतं.
आंतरराष्ट्रीय डेट लाईन एक काल्पनिक रेषा आहे जी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाते. ही रेषा एका कॅलेंडर दिवसाला दुसऱ्या दिवसापासून वेगळं करते. जेव्हा तुम्ही डियोमेड बेटाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाता तेव्हा तुम्ही कॅलेंडरमधील एक दिवस बदलतो. याचा अर्थ तुम्ही भूत काळामधून भविष्यकाळापर्यंत जाता. तसेच माघारी फिरू शकता.
डियोमेड बेटाचा शोध डॅनिश-रशियन व्यक्ती असलेल्या व्हाइटस बेरिंग याने लावला होता. तसेच त्याने १६ ऑगस्ट १७२८ रोजी या बेटाचं नामकरण केलं होतं. तर १९८२ मध्ये अमेरिकेने ही बेटं रशियाकडून खरेदी केली होती.