बॉस असावा तर असा! दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिल्या दीड कोटींच्या भेटवस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 11:48 AM2023-11-08T11:48:30+5:302023-11-08T11:55:35+5:30

दिवाळीनिमित्त काम करणाऱ्या 1500 हून अधिक कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

the owner gave special gift to the employees on diwali | बॉस असावा तर असा! दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिल्या दीड कोटींच्या भेटवस्तू

बॉस असावा तर असा! दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिल्या दीड कोटींच्या भेटवस्तू

दिवाळीच्या सणाला अनेक लोक आपला आनंद इतरांसोबत शेअर करतात. बुरहानपूर येथील एका उद्योगपतीने असंच काहीस केलं आहे. जे स्वतः दिवाळीचा सण आपल्या कुटुंबासोबत मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र आता त्यांनी दिवाळीनिमित्त त्यांच्याकडे काम करणाऱ्या 1500 हून अधिक कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

मोहम्मदपूर परिसरात राहणारे उद्योगपती आनंद प्रकाश चौकसे गरिबांच्या मदतीसाठी नेहमीच आघाडीवर असतात. यावेळी त्यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांसाठी अनोखी योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांच्या घरातील दिवे उत्साहाने लखलखणार आहेत. त्यांच्याकडून मोहम्मदपुरा येथील मायक्रो व्हिजन एकॅडमी शाळेच्या परिसरातील एक सेल लावणार आहेत. या सेलमध्ये केवळ त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारीच खरेदी करतील, त्यांना त्यांच्या आवडीची भेटवस्तू खरेदी करता येईल. ज्यामध्ये कपडे, शूज, चप्पल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह दोन डझनहून अधिक वस्तू उपलब्ध आहेत.

कर्मचाऱ्यांना दीड कोटींच्या भेटवस्तूंचं वाटप

उद्योगपती आनंद प्रकाश चौकसे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की, येथे 1500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यावेळी मी शाळा रुग्णालये आणि इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. 10,000 पर्यंतची खरेदी मोफत ठेवण्यात आली आहे जेणेकरून कोणीही आपल्या इच्छेनुसार वस्तू खरेदी करून दिवाळी साजरी करू शकेल. जर कोणी यापेक्षा जास्त वस्तू स्वतंत्रपणे खरेदी केल्या तर त्यावर 60% सूट देण्यात आली आहे.

जिल्ह्यात उद्योगपतीचं होतंय कौतुक 

दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनोख्या योजना राबवत असल्याने या उद्योगपतीचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. त्यामुळे कर्मचारीही आपल्या कुटुंबियांसोबत खरेदी करून आपला सण उत्साहात साजरा करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: the owner gave special gift to the employees on diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.