रेल्वेने प्रवास करताना केवळ ४५ रूपयात मिळतो विमा, जाणून घ्या काय आहेत याचे नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:09 PM2024-07-12T13:09:52+5:302024-07-12T13:10:43+5:30
Indian Railway Insurance :तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रेल्वेच्या या विम्यासाठी तुम्हाला केवळ ४५ पैसे द्यावे लागतात.
Indian Railway: भारतात नेहमीच रेल्वे अपघात होत असतात. अनेकदा या अपघातांमध्ये प्रवाशांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपला जीव गमवावा लागतो. पण अनेकांना रेल्वेच्या नियमांबाबत फार कमी असते. जसे की, रेल्वेकडून विमाही दिला जातो. मात्र, रेल्वेच्या या विम्याच्या फायदा अशाच लोकांना मिळतो जे तिकीट खरेदी करताना विमा म्हणजे इन्शुरन्स घेतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रेल्वेच्या या विम्यासाठी तुम्हाला केवळ ४५ पैसे द्यावे लागतात.
कधी मिळतो इन्शुरन्स?
रेल्वेचा इन्शुरन्स केवळ अशाच लोकांना मिळतो जे ऑनलाईन तिकीट बुक करतात. तिकीट काऊंटवरून तिकीट घेतल्यावर रेल्वेचा इन्शुरन्स मिळत नाही. सोबतच जनरल डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हा इन्शुरन्स मिळत नाही. हा विमा ऑप्शनल आहे. म्हणजे हा तुम्हाला हवा की नको हे तुमच्यावर अवलंबून आहे.
किती रूपयांचा असतो विमा?
तुम्ही प्रवास करत असताना जर रेल्वेचा अपघात झाला तर तुम्हाला या विम्यामुळे नुकसान भरपाई मिळते. रेल्वेच्या अपघातात जर प्रवाशाचा मृत्यू झाला तर १० लाख रूपये मिळतात. जर अपघातात कुणी दिव्यांग झालं तर त्यांनाही १० लाख रूपये मिळतात. तर कुणी जखमी झाले तर त्यांना २ लाख रूपये नुकसान भरपाई मिळते.
कसा काढाल विमा
रेल्वेचा विमा अशा लोकांना मिळतो जे लोक ऑनलाईन तिकीट काढतात. जेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट बूक करता तेव्हा वेबसाईट किंवा अॅपवर तुम्हाला विम्याचा पर्याय मिळतो. विम्यासाठी तुम्हाला फक्त ४५ पैसे द्यायचे आहेत. विम्याचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला ई-मेल आयडी किंवा मोबाइल नंबरवर एक लिंक मिळेल. ही लिंक विमा देणाऱ्या कंपनीची असते. या लिंकवर क्लिक करून तुम्ही नॉमिनीची माहिती भरू शकता.