रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना पांढरा रंग लावण्याचं कारण, तुम्हालाही नसेल माहीत उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:19 AM2024-03-12T10:19:48+5:302024-03-12T10:20:16+5:30
झाडांच्या खोडांना पांढरा रंग का लावला जातो. यामागे काय कारण असेल? आज याचंच उत्तर जाणून घेऊया...
तुम्ही अनेकदा रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या खोडांना पांढरा रंग लावलेला पाहिला असेल. काही लोकांना प्रश्नही पडला असेल की, झाडांच्या खोडांना पांढरा रंग का लावला जातो. यामागे काय कारण असेल? आज याचंच उत्तर जाणून घेऊया...
पांढऱ्या रंगाच्या पेंटचा वापर सामान्यपणे झाडांच्या सुरक्षेसाठी केला जातो. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या खोडांना लावण्यासाठी मुख्यपणे चुन्याचा वापर केला जातो. याचं एक खास कारणही आहे.
एक्सपर्टनुसार, जर झाडाचं खोड चुन्याने रंगवलं किंवा चूना लावला तर झाडाची साल निघत नाही किंवा गळत नाही. झाडाच्या खोडाला याने मजबुती मिळते.
चुन्याने रंगवल्यानंतर चून प्रत्येक झाडाच्या आत पोहोचतो. चुन्यामुळे झाडांना किड लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडांना उदळी लागत नाही. यामुळे झाडांचं आयुष्य वाढतं.
कॉर्नेल यूनिवर्सिटीच्या अभ्यासकांनुसार, पांढरा पेंट लावल्याने झाडांच्या खोडांची थेट सूर्य किरणांपासूनही सुरक्षा होते. पांढऱ्या रंगामुळे झाडाच्या खोडाचं कमीत कमी नुकसान होतं.
त्याशिवाय झाडाच्या खोडाला पांढरा रंग देण्याचं आणखी एक कारण आहे. रस्त्यावरील झाडांना पांढरा रंग लावला आहे म्हणजे ही झाडं वन विभागाच्या अख्त्यारित आहेत. अशात कुणीही ही झाडं तोडू शकत नाही. हा कायद्याने गुन्हा ठरतो.