शिपाई महिलेच्या पतीला पळवून घेऊन गेली शिक्षिका, मदत म्हणून घरात दिली होती जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:01 PM2024-01-19T13:01:17+5:302024-01-19T13:06:29+5:30

आपल्या गावातील तरूणीला आपल्या घरी जागा देणं तिला महागात पडलं.

The teacher abducted the constable woman's husband, who was given a place in the house as help | शिपाई महिलेच्या पतीला पळवून घेऊन गेली शिक्षिका, मदत म्हणून घरात दिली होती जागा

शिपाई महिलेच्या पतीला पळवून घेऊन गेली शिक्षिका, मदत म्हणून घरात दिली होती जागा

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक हैराण करणारी घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. गावाहून एका तरूणी जेव्हा बीपीएससी शिक्षिका बनण्यासाठी आली तेव्हा एका शिपाई महिलेने सहानुभूती दाखवत तिला आपल्या घरी राहण्यासाठी जागा दिली. पण आपल्या गावातील तरूणीला आपल्या घरी जागा देणं तिला महागात पडलं. बीपीएससी शिक्षिका शिपाई महिलेच्या पतीलाच घेऊन फरार झाली. 

ही घटना बिहारच्या दरभंगामधील आहे. जेव्हा एका शिपाई महिलेने गावाहून आलेल्या एका बीपीएससी शिक्षिकेला आपल्या घरी भाड्याने रूम दिली. तर शिक्षिका तिच्या पतीला घेऊन फरार झाली. आता शिपाई महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

शिपाई महिलेने याबाबत तक्रारीत सांगितलं की, ती तिचा पती आणि 2 वर्षाच्या मुलीसोबत सैदनगर परिसरात राहत होती. दरम्यान उत्तर प्रदेशच्या वाराणसीजवळच्या तिच्या गावातून एक तरूणी बीपीएससी शिक्षक भरतीसाठी बिहारला आली होती.

शिपाई महिलेने सांगितलं की, आपल्या गावातील असल्याने तिने तरूणीला आपल्याच घरात राहण्यासाठी जागा दिली. तरूणीने परीक्षा पासही केली आणि काउन्सेलिंगनंतर शिक्षिका म्हणून तिची नियुक्तीही झाली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण नंतर तरूणीने अचानक असं काही केलं महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली.

तरूणी गायब अन् पतीने फोनवर मागितला घटस्फोट

तरूणीच्या नियुक्तीनंतर सगळं काही ठीक सुरू होतं. साधारण एक महिन्यानंतर शिक्षिका झालेली तरूणी घरातून गायब झाली. यादरम्यान तिला पतीही गायब झाला. महिला चिंतेत पडली आणि आपल्या पतीला शोधू लागली. अनेकदा फोन केल्यावर तिचं पतीसोबत बोलणं झालं, पण पतीने फोनवरच तिला घटस्फोट घेतला. तरूणीला आपलं समजून तिला घरात जागा दिली होती.

आता शिपाई महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन न्यायासाठी भटकत आहे. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसही आता या घटनेची चौकशी करत आहेत. 

Web Title: The teacher abducted the constable woman's husband, who was given a place in the house as help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.