दोघांत आला तिसरा आता सगळं विसरा! प्रपोज करत असताना झाली तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 07:07 PM2022-06-05T19:07:26+5:302022-06-05T19:09:49+5:30

एक व्यक्ती गुडघे टेकून जमिनीवर बसून आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करत होता. पण इतक्यात असं काही घडलं की प्रपोज करण्याचं त्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं.

The third came in two | दोघांत आला तिसरा आता सगळं विसरा! प्रपोज करत असताना झाली तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री अन्...

दोघांत आला तिसरा आता सगळं विसरा! प्रपोज करत असताना झाली तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री अन्...

googlenewsNext

एक व्यक्ती गुडघे टेकून जमिनीवर बसून आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करत होता. पण इतक्यात असं काही घडलं की प्रपोज करण्याचं त्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज करणार होता. या घटनेचा एक व्हिडिओ (Marriage Proposal Video) समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.

ही घटना पॅरिसमधील Disneyland मध्ये घडली, जिथे एक जोडपं फिरायला गेलं होतं. यादरम्यान या व्यक्तीने हिऱ्याची अंगठी काढली आणि गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला प्रपोज करायला सुरुवात केली. मात्र तिथे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याला ही गोष्ट का आवडली नाही हे कळालं नाही आणि त्याने या व्यक्तीच्या हातातील अंगठी हिसकावून घेतली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, पांढरा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती Disneyland समोर आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. त्याच्या हातात अंगठीचा बॉक्स आहे, पण तो उघडून मुलीला प्रपोज करण्याआधीच एक कर्मचारी तिथे आला. डिस्नेलँडचा हा कर्मचारी आधी त्या व्यक्तीकडून अंगठी हिसकावून घेतो आणि नंतर Disneyland च्या समोर असलेल्या पायऱ्यांवरुन त्यांना खाली उतरवतो. याठिकाणी तू प्रपोज करू शकत नाही असं हा कर्मचारी सांगतो.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक या कर्मचाऱ्यावर टीका करत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की या जोडप्याने कोणतंही वाईट कृत्य केलं नाही, परंतु तरीही डिस्नेलँडच्या कर्मचार्‍यांनी त्यांना वाईट वागणूक दिली. त्याचवेळी हा वाद आणखी वाढल्याने डिस्नेलँड पॅरिसच्या वतीने माफी मागण्यात आली आहे. @PopCrave नावाच्या युजरने ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Web Title: The third came in two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.