भुंकत होता म्हणून महिलेनं रागाच्या भरात जिवंत गाडला कुत्रा; नंतर जे घडलं ते पाहून सगळेच थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 10:01 AM2023-03-12T10:01:01+5:302023-03-12T10:06:41+5:30

माध्यमांतील वृत्तांनुसार, ज्या कुत्र्यासोबत ही घटना घडली, तो कुत्रा संबंधित महिलेच्या शेजारच्यांचाच आहे.

The woman buried the dog alive in anger because it was barking in brazil | भुंकत होता म्हणून महिलेनं रागाच्या भरात जिवंत गाडला कुत्रा; नंतर जे घडलं ते पाहून सगळेच थक्क

भुंकत होता म्हणून महिलेनं रागाच्या भरात जिवंत गाडला कुत्रा; नंतर जे घडलं ते पाहून सगळेच थक्क

googlenewsNext

मुक्या प्राण्यावरील अत्याचाराच्या घटना नेहमीच समोर येत असतात. यातील अनेक घटना तर अक्षरशः हदरवून सोडतात. यातच एका महिलेने कुत्रा भूंकला म्हणून रागाच्या भरात त्याला जिवंत गाडल्याची घटना समोर आली आहे. हा कुत्रा संबंधित महिलेवर सातत्याने भुंकत होता. पण यानंतर जे घडले, ते संपूर्ण जगभरात व्हायरल होत आहे. 

शेजारच्या महिलेचाच कुत्रा - 
ही घटना ब्राझीलमधील एका शहरात घडली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ज्या कुत्र्यासोबत ही घटना घडली, तो कुत्रा संबंधित महिलेच्या शेजारच्यांचाच आहे. हा कुत्रा रात्रभर भुंकत होता. यामुळे संबंधित महिलेला झोप लागत नव्हती. यामुळे तिने अस्वस्थ होऊन रात्रीच्याच वेळी बागेत एक खड्डा खोदला आणि त्यात त्या कुत्र्याला जिवंत पुरले. 

जवळपास दीड तास जिवंत राहिला कुत्रा -
कुत्र्याला पुरल्यानंतर ती महिला तेथून निघून गेली आणि दुसरीकडे, कुत्र्याची खरी मालकीन त्याला सर्वत्र शोधू लागली, शोधता शोधता ती शेजारच्या बागेत गेली. तेथे तिला काही काहीतरी विचित्र वाटले. यानंतर तिने ताबडतोब कुदळीच्या सहाय्याने बागेत खोदण्यास सुरुवात केली असता, तिला कुत्रा जिवंत असल्याचे दिसून आले. हा कित्ता तेथे जवळपास दीड तास जिवंत होता असे सांगण्यात येत आहे. तेथून काढल्यानंतर त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांची प्रकृती आता बरी आहे. 

संबंधित महिलेने गुन्हा कबूल केला -
यासंदर्भात कुत्र्याच्या मालकिनीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी केली. यावेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे, यात कुत्र्याला खड्यातून कशा प्रकारे बाहेर काढण्यात आले हे दिसत आहे.

Web Title: The woman buried the dog alive in anger because it was barking in brazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.