महिलेने पतीला सांगितलं ती मित्राच्या बाळाची आई होणार आहे आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 01:19 PM2024-04-19T13:19:44+5:302024-04-19T13:20:44+5:30
आज आम्ही तुम्हाला एका अशा विवाहित महिलेबाबत सांगणार आहोत जी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या बाळाची आई होणार आहे.
आई व्हायची ईच्छा प्रत्येक विवाहित महिलेचं असतं. जर लग्नाच्या अनेक वर्षानंतरही बाळ होत नसेल तर कपलला डॉक्टरांकडे वेगवेगळे उपचार घ्यावे लागतात. अशात बरेच कपल आयव्हीएचचा आधार घेतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा विवाहित महिलेबाबत सांगणार आहोत जी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या बाळाची आई होणार आहे. विवाहित महिला आणि तिच्या पतीने आधीच ठरवलं होतं की, त्यांना बाळ नको आहे.
26 वर्षीय महिलेने रेडिटवर आपली कहाणी शेअर करत सांगितलं की, तिला आणि तिच्या पतीला मुलं नको होती. पण आता ती तिच्या बेस्ट फ्रेंडच्या मुलाची आई होणार आहे. तिने सविस्तर लिहिलं की, तिचा मित्र समलैंगिक आहे. तो त्याच्या पार्टनरसोबत राहतो. त्या दोघांची ईच्छा होती की, मी त्यांच्या बाळाची आई बनावं. अशात मी त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पण हे जसं पतीला समजलं तो नाराज झाला.
महिलेने लिहिलं की, तिच्या पतीला एका दुसऱ्या पुरूषाकडून प्रेग्नेंट होणं आवडलं नाही. महिलेने सगळ्या पद्धतीने आपल्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली की, आपण दोघे त्या बाळाचे अंकल-आंटी असणार आई-वडील नाही. या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या. एकाने लिहिलं की, असं वाटतं एकतर तुम्ही या जोडप्याच्या बाळाला जन्म देऊ शकता नाही तर आपल्या पतीच्या बाळाला. ही तुमची पसंत आहे.
एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की, तुमच्या पतीला राग येण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही असा विचार केलास कसा? तिसऱ्याने लिहिलं की, असं वाटत आहे की, मित्राच्या बाळाची आई होण्याची घोषणा करण्याआधी तुम्ही पतीला याबाबत सविस्तर सांगायला हवं होतं. चौथ्याने लिहिलं की, तुम्ही आणि तुमच्या पतीने आधी बाळ नको असल्याचं ठरवलं आणि आता तुम्ही दुसऱ्याच्या बाळाला जन्म देत आहात. हे तर समजण्या पलिकडलं आहे.