महिलेच्या ओरडण्याचा आवाज, शेजाऱ्याने बोलावले पोलीस, येऊन पाहताच मारला डोक्यावर हात, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 10:38 AM2023-07-13T10:38:14+5:302023-07-13T10:38:52+5:30
Jara Hatke News: शेजारून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसही लावाजम्यासह मदतीसाठी निघाले. पोलिसांच्या तीन गाड्या सांगितलेल्या ठिकाणी दाखल झाल्या. मात्र जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा जे काही दिसलं ते पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.
शेजारून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसही लावाजम्यासह मदतीसाठी निघाले. पोलिसांच्या तीन गाड्या सांगितलेल्या ठिकाणी दाखल झाल्या. मात्र जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा जे काही दिसलं ते पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. त्याचं कारण म्हणजे जो ओरडण्याचा आवाज येत होता तो कुठल्या महिलेचा नाही तर एका पोपटाचा होता, असं समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा पोपट झाला म्हणण्याची वेळ आली. ही घटना ब्रिटनमधील कॅनवे येथे घडली.
कॅनवे येथील स्टीव्ह वुड्स हे गेल्या २१ वर्षांपासून आपल्या घरामध्ये पक्षी पाळत आहेत. सध्या त्यांच्याकडे बुग्गीज, निळे आणि सोनेरी मकॉय, एक हेन मकॉय, दोन अॅमेझॉन पोपल, आठ भारतीय रिंगनेक आणि हिरव्या पंखांचा मकॉय यांच्यासह इतर प्रजातींचे पक्षी आहेत.
स्टीव वुड्स यांनी सांगितले की, माझ्याकडील पक्षी साधारणपणे सकाळच्या वेळी खूप ओरडतात. मात्र त्या दिवशी माझ्याकडे असलेल्या पोपटांपैकी फ्रेडी नावाच्या पोपटाने महिलेसारखा ओरडण्याचा आवाज काढला. काही वेळाने पोलीस आले. मी हसतच दरवाजा उघडला. पोलीस का आले आहेत, असा प्रश्न मला पडला. त्यातला एक पोलीस म्हणाला की चिंता करू नका मला वाटतं की, आम्ही त्याला पकडलंय, मी म्हणालो की, मी काय केलंय, तर ते म्हणाले की, तुमच्या घरातून महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत आहे, अशी तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आम्ही येथे तपास करण्यासाठी आलो आहोत. पोलिसांनी योग्य काम केलं. तसेच ज्यांनी पोलिसांना फोन केला त्यांनीही योग्यच केलं. मला याबाबत काहीही वाईट वाटलं नाही, असं स्टीव्ह वूड्स यांनी पुढे सांगितलं.
मात्र या सर्व प्रकारामुळे लोक अवाक् झाले. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ओरडण्याचा आवाज कुण्या महिलेचा नाही तर एका पोपटाचा होता, असे तपासातून समोर आले. जेव्हा हे समजले. तेव्हा पोलिसांनाही हसू आवरता आले नाही. आता हे प्रकरण संपुष्टात आले आहे.