जगातील सर्वात सुंदर AI मॉडेल, हिला भेटण्यासाठी वेळ मागतायत लोक; महिन्याला कमावते 9 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 05:39 PM2024-01-16T17:39:18+5:302024-01-16T17:40:11+5:30

तयार करायला लागले केवळ 3.69 लाख रुपये...!   

The world's most beautiful AI model, people ask for time to meet her; Earning Rs 9 lakh per month | जगातील सर्वात सुंदर AI मॉडेल, हिला भेटण्यासाठी वेळ मागतायत लोक; महिन्याला कमावते 9 लाख रुपये

जगातील सर्वात सुंदर AI मॉडेल, हिला भेटण्यासाठी वेळ मागतायत लोक; महिन्याला कमावते 9 लाख रुपये

स्‍पेनमधील एका कंपनीने एक एआई मॉडल (AI Model ) विकसीत केली आहे. ही मॉडेल अत्यंत सुंदर आहे. या एआय मॉडेलला ऐटाना लोपेज (Aitana Lopez) असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, इंस्टाग्रामवर या मॉडेलचे 250,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. यावरूनच हिच्या पॉप्युलॅर‍िटीचा अंदाज लावला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, ही मॉडेल स्पेनमधील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली मॉडेल म्हणून ओळखली जाते. मात्र यामागे एक खास रहस्य आहे.

मिररने दिलेल्या एका वृत्तानुसार, नितळ त्वचा, मोहक स्मित, एथलेटिक बॉडी आणि गुलाबी केस, असलेली ही सुंदरी अनेकवेळा जगात घडणाऱ्या घटनांची छायाचित्रेही शेअर करत असते. याशिवाय ती विविध ब्रँड्सची जाहिरात करून प्रत्येक जाहिरातीतून 91,000 रुपये कमावते. आपल्याला आश्चर्य वाटेल की, पण हिचे मासिक उत्पन्न 9 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. खरे तर, हे एक एआय मॉडेल आहे, हे लोकांना माहीत आहे. पण तरीही ते बघण्यासाठी लोक संबंधित कंपनीला विनंती करत आहेत.. 

एटानाला कार्यान्वित ठेवण्यासाठी काम करते संपूर्ण टीम - 
ऐटाना लोपेझच्या इंस्टाग्राम बायोमध्ये दिलेल्यामाहितीनुसार, या 25 वर्षीय स्पॅनिश मॉडेलला ‘एआय’च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. तिच्या व्यवस्थेत आणि तिला चालविण्यासाठी एक संपूर्ण टीम काम करते. पुढील आठवडाभर ऐटाना काय करणार? कुठे जाणार? आणि कोणते फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर अपलोड करणार? याचे नियोजन केले जाते. विशेष म्हणजे, ऐटानाचे फोटो फोटोशॉपच्या माध्यमाने तयार केले जातात.

भेटण्यासाठी वेळ मागतायत लोक - 
स्पॅनिश फॅशन एजन्सी द क्लुलेसने ही मॉडेल तयार केली आहे. यासंदर्भात बोलताना कंपनीच्या सह संस्‍थापक डायना नुनेज म्हणाल्या, लोकांनी सुरुवातीला तर हिच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले. मात्र आता हिचे कौतुक होत आहे. अनेकांकडून भेटण्याची इच्छाही व्यक्त होत आहे. कंपनी हिला बार्सिलोनातील सर्वात उत्साही महिला म्हणून सादर केले आहे. हिला तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला असून एकूण 3.69 लाख रुपये एवढा खर्च आला आहे.

Web Title: The world's most beautiful AI model, people ask for time to meet her; Earning Rs 9 lakh per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.