हा आहे जगातील सर्वात ताकदवान माणूस, जाणून घ्या याचा डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:46 PM2022-07-22T17:46:05+5:302022-07-22T17:54:57+5:30

जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती ठरलेल्या टॉम स्टोल्टमनने अवघ्या एका आठवड्यातच तब्बल 14 किलो वजन वाढवलं होतं. एका स्पर्धेच्या वेळी त्याने ही कामगिरी केली.

The World's Strongest Man only did 3 moves for 2 months when he started lifting. He says it built the foundation for his record-breaking strength. | हा आहे जगातील सर्वात ताकदवान माणूस, जाणून घ्या याचा डाएट प्लॅन

हा आहे जगातील सर्वात ताकदवान माणूस, जाणून घ्या याचा डाएट प्लॅन

Next

वजन वाढवणं किंवा कमी करणं हे किती कष्टाचं काम असतं ते तुम्हाला माहिती असेलच. बॉडीबिल्डर्स कित्येक महिने जिममध्ये मेहनत करून आपलं वजन नियंत्रणात ठेवत असतात. मात्र, जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती ठरलेल्या टॉम स्टोल्टमनने अवघ्या एका आठवड्यातच तब्बल 14 किलो वजन वाढवलं होतं. एका स्पर्धेच्या वेळी त्याने ही कामगिरी केली.

आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.टॉम स्टोल्टमन हा दोन वेळा जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती ठरला आहे. यापूर्वी एकदा वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट मॅन ही स्पर्धा जिंकलेल्या टॉमने या वर्षी पुन्हा या स्पर्धेत भाग घेतला होता. 24 ते 29 मे दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेवेळी त्याने एकाच आठवड्यात तब्बल 14 किलो वजन वाढवलं होतं. बिझनेस इनसायडर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत टॉमने आपला डाएट प्लॅनजाहीर केला.

180 किलो वजन असणारा टॉम एरव्ही आपलं वजन कायम ठेवण्यासाठी दररोज सुमारे 8000 कॅलरी खातो. मात्र, स्पर्धेच्यावेळी त्याने दररोज तब्बल 15000 कॅलरीज असणारे पदार्थ खाल्ले. 15 हजार कॅलरीज म्हणजे जवळपास आठ लोकांचे एका वेळेचं जेवण होईल एवढं अन्न. मूळचा स्कॉटलंडचा असणाऱ्या टॉमने सांगितलं, की यासाठी त्याला विशेष काही करावं लागलं नाही. कारण यूकेच्या तुलनेत अमेरिकेतील सर्व्हिंग साईज  जास्त असते. त्यामुळे एकाचवेळी भरपूर कॅलरीज खाल्ल्या जातात. “अमेरिकेत एका वेळेच्या जेवणात बीबीक्यू सॉस, केचअप, चीज बर्गर आणि चॉकलेट मिल्कशेक एवढं देतात. या सगळ्या पदार्थांमध्ये मिळून सुमारे 1,721 कॅलरीज असतात. हेच पदार्थ यूकेमध्ये खाल्ले तर त्यात 1,369 कॅलरीज असतील. म्हणजेच, जर मी अमेरिकेत सहा वेळा जेवण केलं, तर तेवढ्याच कॅलरीज मिळवण्यासाठी मला यूकेमध्ये 10 ते 11 वेळा जेवण करावं लागेल.” असं टॉमने सांगितलं.

स्टॉलमनने सांगितलं, की त्याने स्पर्धेवेळी मुद्दाम वजन वाढवलं नव्हतं. सहा दिवसांच्या या स्पर्धेवेळी त्याची एनर्जी कायम रहावी यासाठी खास डाएट प्लॅन डिझाईन करण्यात आला होता. कारण स्पर्धेमध्ये वजन उचलून, किंवा इतर टास्ट करुन त्याच्या बऱ्याच कॅलरीज बर्न होत होत्या. त्याच्या डाएटमध्ये भरपूर प्रोसेस्ड फूड सामाविष्ट होतं. यामुळे त्याचं वजन एवढ्या झपाट्याने वाढलं. यामुळे त्याचं वजन 180 किलोंहून अधिक झालं होतं. मात्र, या वाढलेल्या वजनाचा त्याला स्पर्धेमध्ये फायदा झाला.

असा होता डाएट प्लॅन
टॉम सकाळच्या नाश्त्यामध्ये स्ट्रॉबेरी, केळी आणि मधाचे पॅनकेक खायचा. त्यानंतर दुपारच्या जेवणात तीन बर्गर आणि फ्राईज यांचा समावेश असायचा. रात्रीच्या जेवणासाठी तो पास्ता खात असे, तसंच स्वीट डिश म्हणून चॉकलेट केक खाणं टॉमला आवडायचं.

स्पर्धेव्यतिरिक्त दैनंदिन जीवनामध्ये टॉम दररोज आठ अंडी, चार पराठे आणि मशरूम अशा गोष्टी खातो. 20-30 स्ट्रॉबेरी, एक केळं आणि तीन चमचे व्हे प्रोटीन पावडर यांचा शेक, आणि टॉमचा आवडता बर्गर या गोष्टींचा समावेशही त्याच्या डाएटमध्ये असतो. वर्कआउट करण्यापूर्वी तो बर्गर खातो, तसंच वर्कआउटनंतर प्रोटिन शेक घेतो आणि दोन डोनट्स खातो. सोबतच दिवसभरात 250 ग्रॅम भात किंवा नूडल्स, किंवा एक मोठा बटाटा, भाज्या किंवा 300 ग्रॅम मांस यांचाही त्याच्या जेवणात समावेश असतो. एकूण डाएटमध्ये तो 90 टक्के हेल्दी फूड आणि 10 टक्के जंक फूड असं प्रमाण ठेवतो.

Web Title: The World's Strongest Man only did 3 moves for 2 months when he started lifting. He says it built the foundation for his record-breaking strength.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.