जगातला सर्वात वाईट मोबाईल नंबर, ज्याला मिळाला त्याचा मृत्यू झाला; आता घ्यायला घाबरतात लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 02:31 PM2022-03-27T14:31:19+5:302022-03-27T14:32:01+5:30
हा नंबर घेणाऱ्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालीय दहशत...
आपण या पृथ्वीवरील अनेक भीतीदायक ठिकाणांसंदर्भात ऐकले अथवा वाचले असेल. जगात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांचे नाव ऐकले तरी लोकांचा थरकाप उडतो. मात्र, आपण कधी अशाच भयावह फोन नंबरसंदर्भात ऐकले आहे का? आज आम्ही आपल्याला एका अशाच वाईट आणि भयावह फोन नंबर संदर्भात सांगणा आहोत. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्याने कुणी हा फोन नंबर घेतला त्याचा मृत्यू झाला आहे. (Haunted Mobile Number)
जगातील सर्वात वाईट आणि भयावह नंबर -
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हा जगातील एवढा वाईट नंबर आहे, की ज्याने कुणी तो घेतला त्याच्या घरापर्यंत मृत्यू पोहोचला. एक-दोन नव्हे, तर गेल्या तब्बल 20 वर्षांपासून असेच सुरू आहे. या भयावह मोबाईल नंबरची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. आतापर्यंत तीन जणांना हा फोन नंबर मिळाला आहे आणि या तिघांचाही अत्यंत वाईट पद्धतीने मृत्यू झाला आहे. या तिघांसोबत एवढी वाईट घटना घडली, की ते जाणून कुणाचाही थरकाप उडेल.
हा फोन नंबर बल्गेरियातील आहे. हा नंबर सर्वप्रथम मोबिटेल कंपनीच्या सीईओंनी घेतला होता. त्याचे नाव व्लादिमीर गोसनोव्ह असे होते. त्यांनी 0888888888 हा फोन नंबर स्वतःसाठी जारी केला होता. त्यांनी 2000 मध्ये हा नंबर जारी केला होता. यानंतर दुसऱ्याच वर्षी व्लादमीर यांचा मृत्यू झाला. सांगण्यात येते की, कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती, मात्र, मृत्यूचे खरे कारण फोन नंबर होते.
तीन जणांच्या मृत्यूने निर्माण झालीय दहशत -
व्लादमीरनंतर, दिमेत्रोव्ह नावाच्या एका कुख्यात ड्रग डिलरने हानंबर वापरायला सुरुवात केली. हा नंबर घेतल्यानंतर काही काळातच दिमेत्रोव्हचा खून झाला. दिमेत्रोव्हला एका रशियन माफियाने मारले होते. यानंतर हा नंबर बल्गेरियातील एका व्यापाऱ्यानेच घेतला होता. 2005 मध्ये तांचीही हत्या झाली. या तीन मृत्यूंनंतर, हा नंबर कायमचा बंद करण्यात आला.