'या' गावात कोणत्याही वस्तूला हात लावण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:55 AM2019-05-12T00:55:23+5:302019-05-12T00:55:35+5:30

भारतात रहस्यांनी भरलेले अनेक किस्से ऐकायला मिळतील. देशातील अनेक अशी शहरं आहेत, ज्यांचे विविध किस्से तुम्ही कधी ऐकलेही नसतील.

There is no ban on any item in this 'village' | 'या' गावात कोणत्याही वस्तूला हात लावण्यास बंदी

'या' गावात कोणत्याही वस्तूला हात लावण्यास बंदी

Next

भारतात रहस्यांनी भरलेले अनेक किस्से ऐकायला मिळतील. देशातील अनेक अशी शहरं आहेत, ज्यांचे विविध किस्से तुम्ही कधी ऐकलेही नसतील. भारतातील एक असंच गाव ज्याचं रहस्य तुम्ही ऐकाल तर चक्रावून जाल.
हिमाचल प्रदेशातील हे मलाणा गाव आहे. देशातील रहस्यमय अशा ठिकाणांमध्ये या गावाचं नाव घेतलं जातं. या गावात राहणारे लोकं बाहेरच्या लोकांपासून अतिशय सावध राहतात. इतकचं नव्हे, तर बाहेरच्या लोकांसाठी या गावात विशेष नियम आणि कायदे बनविण्यात आले आहेत.
हे कायदे बाहेरच्यांना तंतोतत पाळावे लागतात. या गावात बाहेरून कोणी माणूस गेला आणि गावात असणाऱ्या कोणत्याही वस्तूला हात लावला तर त्याला दंड भरावा लागतो. हा दंड जवळपास एक हजार रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत असतो.

फक्त वस्तूच नाही तर गावातील कोणत्याही माणसाला स्पर्श करायचं नाही, असा नियम घालून देण्यात आला आहे. गावात रहस्यमयरीत्या भितींवर हाडे आणि खोपडी लटकलेली पाहायला मिळते. हे सांगाडे कोणत्याही माणसाचे नसून जनावरांचे आहेत. बळी दिलेल्या जनावरांचे सांगाडे लटकलेले असल्याने बाहेरून आलेल्या माणसांसाठी ते आकर्षित करतात. त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी हे कायदे बनविण्यात आले आहेत.

Web Title: There is no ban on any item in this 'village'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.