हरणाच्या शिकारीसाठी सिंह सज्ज; 'या' फोटोत शोधून दाखवा बरं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:27 PM2020-07-09T15:27:10+5:302020-07-09T15:27:45+5:30
अमेरिकेतील न्यू मॅक्सिको येथील रिओ मोरा राष्ट्रीय उद्यानातील या फोटोतील सिंह नेटिझन्सनाही शोधता येत नाही
सिंह हा नेहमी टोळीनं शिकार करतो... पण माऊंटन सिंह हा वाघाप्रमाणे दबा धरून बसून योग्य संधी निर्माण होण्याची प्रतीक्षा करतो. शिकार करताना वाघ प्रत्येक पाऊल एवढं हळू टाकतो की त्याच्या पावलाचा आवाजही कुणाला ऐकू येत नाही. तीच कला डोंगराळ भागात राहणाऱ्या सिंहाकडे असते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे आणि त्यात माऊंटन सिंह हरणाच्या एवढ्या जवळ आहे, परंतु तो नक्की कुठे लपला आहे, हे कुणालाच सांगता येत नाही. अमेरिकेतील न्यू मॅक्सिको येथील रिओ मोरा राष्ट्रीय उद्यानातील या फोटोतील सिंह नेटिझन्सनाही शोधता येत नाही.
राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेरात हा फोटो कैद झाला आहे. ऑक्टोबर 2019चा हा फोटो असून यात कॅमेरानजीक हरीण दिसत आहे. पण, अवघ्या काही पावलावर सिंह दबा धरून बसला आहे. पण, त्याला हेरणं सहज शक्य नाही. चला तुम्हाला तो सापडतोय का ते पाहूया...
#WildlifeWednesday Take a moment today to search for the hidden mountain lion that is following this elk. How long did...
Posted by Rio Mora National Wildlife Refuge on Wednesday, July 1, 2020
हा फोटो 1 जुलैला फेसबुकवर शेअर करण्यात आला. 10 हजारांहून अधिक लोकांनी तो शेअर केला आहे. तर 1.5 हजार कमेंट आणि 3.7 हजार लाईक्स या फोटोला मिळाले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल 2020 च्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवलेला नाही; या देशानं फेटाळलं वृत्त
शाहिद आफ्रिदीची मोठी घोषणा; इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला देणार 'सहारा'!
बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून केली शिकार!
वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम
सौरव गांगुलीच्या विधानाला किंमत नाही, दर आठवड्याला अशी चर्चा उठवली जाते; पीसीबीची टीका
Video : आकाश चोप्राच्या पत्नीनं दिली घर सोडून जाण्याची धमकी, जाणून घ्या कारण!