जगातील 3 असे व्यक्ती जे विना पासपोर्ट कुठेही जाऊ शकतात, कुणालाही नाही अशी सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 02:01 PM2023-09-08T14:01:48+5:302023-09-08T14:02:33+5:30

Travel Documents : जगात असे तीन व्यक्ती आहेत ज्यांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज पडत नाही. चला जाणून घेऊ ते कोण आहेत.

These 3 people can travel anywhere without a passport amid diplomatic passports | जगातील 3 असे व्यक्ती जे विना पासपोर्ट कुठेही जाऊ शकतात, कुणालाही नाही अशी सूट

जगातील 3 असे व्यक्ती जे विना पासपोर्ट कुठेही जाऊ शकतात, कुणालाही नाही अशी सूट

googlenewsNext

Travel Documents : जगातील कोणत्याही व्यक्तीला एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज पडते. पासपोर्टशिवाय कुणीही दुसऱ्या देशात प्रवेशही करू शकत नाहीत. राष्ट्रपती असो वा पंतप्रधान जेव्हा ते एका देशातून दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट वापरावा लागतो. पासपोर्ट हा व्यक्तीची ओळख सांगतो आणि कोणत्या देशाचा नागरिक आहे हे दाखवतो. यात व्यक्ती सगळी माहिती असते. पण तुम्हाला माहीत नसेल जगात असे तीन व्यक्ती आहेत ज्यांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज पडत नाही.

ब्रिटनचा राजा किंवा राणी

किंग चार्ल्स तृतीय नुकतेच ब्रिटनचे राजा बनले. त्यांची आई राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर हे पद त्यांच्याकडे आलं. ते राजा बनल्यानंतर यूकेच्या विदेश मंत्रालयाने सगळ्या देशांना सूचना दिली की, ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांना सन्मानाने कुठेही येण्या-जाण्याची परवानगी दिली जावी आणि त्यांच्या प्रोटोकॉलची खास काळजी घ्यावी. किंग चार्ल्सआधी त्यांची आई राणी एलिजाबेथ द्वितीय यांना विना पासपोर्ट कुठेही जाण्याचा अधिकार होता.

विना पासपोर्ट कुठे जाण्याचा हा खास अधिकार केवळ गादीवर बसणाऱ्या राजाला किंवा राणीला असतो. किंग चार्ल्स तृतीय यांच्या पत्नीला जर परदेशात जायचं असेल तर त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्टची गरज पडते. यानुसारच राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्यावेळी त्यांचे पती प्रिंस फिलिपर यांनाही परदेशात जाण्यासाठी डिप्लोमेटिक पासपोर्ट बाळगावा लागत होता.

जपानचे सम्राट आणि सम्राज्ञी

सध्या जपानचे सम्राट नारूहिता आङेत आणि त्यांची पत्नी मसाको ओवादा या जपानच्या सम्राज्ञी आहेत. सम्राट आणि सम्राज्ञी यांच्यासाठी विना पासपोर्ट परदेशात जाण्याची व्यवस्था 1971 मध्ये सुरू झाली होती. जपान जगातल्या सर्व देशांना अधिकृत पत्र की, सम्राट आणि सम्राज्ञी यांना तुमच्या देशात येण्यासाठी या पत्रालाच त्यांचा पासपोर्ट मानण्यात यावा.

Web Title: These 3 people can travel anywhere without a passport amid diplomatic passports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.