जगातले 4 असे देश ज्यांच्याकडे नाही स्वत:चं विमानतळ, शेजारी देशात जाऊन करतात विमानाने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 09:11 AM2023-02-24T09:11:45+5:302023-02-24T09:12:55+5:30
Countries With No Airports : जगात 4 असेही देश आहेत ज्यांच्याकडे स्वत:चे विमानतळ नाहीयेत. नक्कीच हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे देश...
Countries With No Airports : आज जग एक ग्लोबल व्हिलेज झालं आहे. लोक विमानात बसून एका देशातून दुसऱ्या देशात फिरायला जातात. यासाठी भारतासहीत जगातल्या अनेक देशांमध्ये विमानतळाचं जाळं विणलं गेलं आहे. पण जगात 4 असेही देश आहेत ज्यांच्याकडे स्वत:चे विमानतळ नाहीयेत. नक्कीच हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे देश...
दुसऱ्या देशात जाऊ पकडतात विमान
आजच्या काळातही जगात 4 देश असे आहेत ज्यांच्याकडे एकही विमानतळ नाही. येथील रस्ते किंवा जलमार्गाने शेजारी देशात जातात आणि तिथून विमानाने पुढे जातात. दुसऱ्या देशातून येणारे पर्यटकही असंच करतात.
लिकटेंस्टीन (Liechtenstein)
लिकटेंस्टीन जगातल्या सगळ्यात लहान देशांपैकी एक आहे. हा देश केवळ 75 किमी भूभागावर पसरलेला छोटा देश आहे. या देशात त्यांचं विमानतळ नाही. या देशात जाण्यासाठी ज्यूरिख येथील विमानतळावर उतरावं लागतं. त्यानंतर रस्ते मार्गे या देशात पोहोचता येतं.
व्हॅटिकन सिटी (Vatican City)
व्हॅटिकन सिटी ख्रिस्ती लोकांचं जगातलं सगळ्यात मोठं केंद्र आहे. इटलीची राजधानी रोमच्या आत साधारण 109 एकरमध्ये वसलेल्या या देशात आजही एकही विमानतळ नाहीये. या देशात जाणारे लोक आधी रोमच्या विमानतळावर उतरतात. त्यानंतर टॅक्सी किंवा बस पकडून या देशात येतात.
सॅन मारिनो (San Marino)
सॅन मारिनोही एक छोटा देश आहे. या देशातही विमानतळ नाही. या देशात जाण्यासाठी प्रवाशांना इटलीच्या रिमिनी विमानतळावर उतरावं लागतं. त्यानंतर गाडीने पुढे प्रवास करावा लागतो.
मोनाको (Monaco)
यूरोपमध्ये असलेला हा देश जगातला दुसरा सगळ्यात लहान देश आहे. हा देश तीन बाजूने फ्रान्सने वेढलेला आहे. या देशातही विमानतळ नाहीये. इथे येणार लोक फ्रान्सच्या नाइट कोटे विमानतळावर उतरतात आणि त्यानंतर कॅबने या देशात पोहोचतात.