'या' देशांमध्ये भीक पडतं महागात, मिळते ही शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 02:58 PM2018-08-27T14:58:01+5:302018-08-27T14:58:20+5:30
वाचायला जरा हे विचित्र वाटत असेल पण हे खरं आहे. भारतात भीक मागणे गुन्हा नाही. पण असे काही देश आहेत ज्यांचे कायदे भीक मागण्यावर बंदी आणतात.
(Image Credit : Stuff.co.nz)
भीक मागणे याकडे कधीही समाजात सन्मानाने पाहिले गेले नाही. भारतात लोकांच्या संख्येने भिकारी असतील. पण असेही काही देश आहेत जिथे भीक मागणे गुन्हा आहे. वाचायला जरा हे विचित्र वाटत असेल पण हे खरं आहे. भारतात भीक मागणे गुन्हा नाही. पण असे काही देश आहेत ज्यांचे कायदे भीक मागण्यावर बंदी आणतात.
चीन
चीनमध्ये भीक मागणे बेकायदेशीर आहे. चीनच्या पब्लिक सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन पनिशमेंट कायद्यानुसार, दुसऱ्यांना भीक मागण्यासाठी दबाव आणणे व्यक्तीच्या स्वातंत्र्यात अडसर निर्माण करण्यासारखे आहे. याचे उल्लंघन करणाऱ्याला १० ते १५ दिवसांचा तुरुंगवास होऊ शकतो.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियात सर्वच राज्यांमध्ये भीक मागण्यासंबंधी वेगवेगळे कायदे आहेत. दक्षिणि ऑस्ट्रेलियामध्ये भीक मागितल्यास २५- अमेरिकी डॉलरचा दंड भरावा लागू शकतो.
यूनायटेड किंगडम
यूकेमध्ये भीक मागणे १८२४ मध्ये तयार करण्यात आलेल्या एका कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. या कायद्यानुसार, सार्वजनिक स्थळांवर झोपणे किंवा भीक मागणे बेकायदेशीर आहे.
डेन्मार्क
डेन्मार्कमध्ये भीक मागणे तेथील कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने भीक मागणे बेकायदेशीर आहे. त्यासाठी ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो.
फ्रान्स
फ्रान्समध्ये भीक मागणे बेकायदेशीर ठरवणारा कायदा १९९४ मध्ये संपुष्टात आला होता. पण लहान मुलांना भीक मागण्यासाठी बळजबरी करणे किंवा भीक मागण्यासाठी जनावरांचा आधार घेणे आजही बेकायदेशीर आहे. इथे लोक परिस्थीतीमुळे भीक मागतात. अनेकदा लोक आपल्या चेहऱ्यावर मास्क लावून भीक मागतात. जेणेकरुन त्यांची ओळख पटू नये.
फिनलॅंड
फिनलॅंड या देशातही २००३ मध्ये पब्लिक ऑर्डर अॅक्टनुसार भीक मागणे बेकायदेशीर आहे.