आयडियाची कल्पना; ब्रेस्ट फिडिंगबाबत जागृतीसाठी भन्नाट कॅम्पेन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 03:21 PM2019-04-03T15:21:03+5:302019-04-03T15:26:50+5:30
ब्रिटनमध्ये मदर्स डे ३१ मार्चला साजरा केला जातो. याच दिवशी लंडनच्या काही इमारतींवर Inflatables Boobs लावण्यात आले.
ब्रिटनमध्ये मदर्स डे ३१ मार्चला साजरा केला जातो. याच दिवशी लंडनच्या काही इमारतींवर Inflatables Boobs लावण्यात आले. शहरातील जास्तीत जास्त ठिकाणांवर हे लावण्यात आले. हे ठिकठिकाणी लावण्याचं कारण ब्रेस्टफिडींग अवेअरनेस हे होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे समोर आला होता, ज्यात समोर आलं की, महिलांकडून सार्वजनिक ठिकाणांवर स्तनपान करण्याला जगभरात चुकीचं मानलं जातं. पण आता या कॅम्पेनच्या माध्यमातून ही चुकीची धारणा मोडण्यासाठी काम सुरू करण्यात आलं आहे.
Tania Boler ने एक हॅशटॅग सुरू केला आहे. Tania एका कंपनीमध्ये सीईओ आहे. तिनेच हे कॅम्पेन सुरू केलंय. #FreetheFeed हा हॅशटॅग वापरून तिने हे कॅम्पेन सुरू केलं. यावर अनेक पोस्ट सोशल मीडियात शेअर होऊ लागल्या.
“Let’s just take a quick detour up here. I want to get a photo.” Son: “Of what? Is there a giant boob statue or something?” “Actually, yes”. #FreeTheFeedpic.twitter.com/76rtJa7lPQ
— Emma Pickett (@makesmilk) April 1, 2019
हे कॅम्पेन लोकांना जागरूक करण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. महिलांना स्तनपानादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणजे लोक म्हणतात की, त्यांनी स्टाफ रूममध्ये हे करावं किंवा कारमध्ये बसून हे करावं वगैरे वगैरे.....
स्तनपान करताना लोक अनेकदा महिलांसोबत गैरवर्तणूक करतात. त्यामुळे या कॅम्पेनचा उद्देश आहे की, स्तनपानाला लोकांनी वेगळ्या दृष्टीने बघू नये. महिला कधीही सार्वजनिक ठिकाणांवर त्यांच्या बाळांना स्तनपान करवू शकतात. या कॅम्पेनचं अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे.