'या' झाडांच्या मदतीने घरातून पळून जातात डास, तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 01:22 PM2024-07-01T13:22:57+5:302024-07-01T13:49:56+5:30

डास पळवण्यासाठी काही झाडांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील. 

These plants help to get away mosquitoes | 'या' झाडांच्या मदतीने घरातून पळून जातात डास, तुमच्याकडे आहेत का?

'या' झाडांच्या मदतीने घरातून पळून जातात डास, तुमच्याकडे आहेत का?

पाऊस आला की, डासांसोबत अनेक आजारही येतात. डासांमुळे अनेक गंभीर आजार होतात. खासकरून या दिवसात डेंग्यू आणि मलेरियाचा जास्त धोका असतो. त्यामुळे घरात डास होऊ नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. डास दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. आज आम्ही तुम्हाला आणखी एक वेगळा उपाय सांगणर आहोत. डास पळवण्यासाठी काही झाडांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील. 

१) सिट्रोनेलो

सिट्रोनेला ही एक सुंगधी वनस्पती आहे. या वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीही तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील. या वनस्पतीच्या मदतीने डास पळवता येऊ शकतात.कारण या वनस्पतीच्या वासामुळे डास पळतात. त्यांना या वनस्पतीचा वास सहन होत नाही. ही वनस्पती तुम्ही तुमच्या अंगणात किंना बाल्कनीमध्ये लावू शकता.

२) पेटूनिया

पेटूनिया हे एक फारच आकर्षक फूल आहे जे तुम्ही अनेकदा कुठेना कुठे पाहिलं असेल. हे फूल बाराही महिने उगवतं. या फुलाला नैसर्गिक किटकनाशकही म्हटलं जातं. या फूलाचं झाड तुमच्या घराच्या आवारात किंवा घरात लावल्यास डास कमी येतील.

३) लॅव्हेंडर

लॅव्हेंडरचा सुंगध हा डासांना तुमच्या घरात येण्यापासून रोखतो. जांभळ्या रंगाचं फूल असलेलं हे झाड उन्हाळ्यात सहज मिळतं. हे झाड तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत लावू शकता.

४) लेमनग्रास

लेमनग्रास हे साइट्रोनला या प्रजातीचं गवत आहे. ज्या ठिकाणी लेमनग्रास असते त्या ठिकणी डास जास्त काळ राहू शकत नाहीत. 

५) पुदीना

तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.

Web Title: These plants help to get away mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.