Jara Hatke: सोन्याच्या भावात विकले जातात हे बटाटे, एक किलोची किंमत ऐकून विस्फारतील डोळे, असं आहे वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:07 PM2023-04-13T19:07:53+5:302023-04-13T19:08:35+5:30

Jara Hatke News: एक किलो बटाटे खरेदी करण्यासाठी तुम्ही किती किंमत मोजता? २० रु., ३० रु. ५० रु. फार फार तर ६० ते ७० रुपये. मात्र एक किलो बटाट्यांची किंमत ५० हजार रुपये असल्याचंसांगितलं तर ते तु्म्हाला खरं वाटेल का?

These potatoes are sold at the price of gold, the price of one kilo makes eyes widen | Jara Hatke: सोन्याच्या भावात विकले जातात हे बटाटे, एक किलोची किंमत ऐकून विस्फारतील डोळे, असं आहे वैशिष्ट्य

Jara Hatke: सोन्याच्या भावात विकले जातात हे बटाटे, एक किलोची किंमत ऐकून विस्फारतील डोळे, असं आहे वैशिष्ट्य

googlenewsNext

बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अनेक भाज्यांमध्ये बटाट्याचा वापर सर्रासपणे केला जातो. मात्र एक किलो बटाटे खरेदी करण्यासाठी तुम्ही किती किंमत मोजता? २० रु., ३० रु. ५० रु. फार फार तर ६० ते ७० रुपये. मात्र एक किलो बटाट्यांची किंमत ५० हजार रुपये असल्याचंसांगितलं तर ते तु्म्हाला खरं वाटेल का? या भावामध्ये तर तुम्ही तोळाभर सोनं खरेदी करू शकता. जगामध्ये बटाट्यांची एक प्रजाती अशी आहे ज्याच्या प्रति किलोसाठी ५० हजार रुपये मोजावे लागतात. मात्र एवढे महाग बटाटे असूनही ते खरेदी करण्यासाठी लोक रांगा लावतात.

येथे आम्ही ज्या बटाट्यांबाबच बोलत आहोत. त्यांची प्रजाती ही आपल्या घरात येणाऱ्या बटाट्यांपेक्षा एकदम वेगळी आहे. तिचं नाव la bonnotte असं आहे. या जातीचे बटाटे विशेषकरून फ्रान्समध्ये आढळून येतात. त्यांचं उत्पादन हे विशेष ऋतुमध्ये घेतलं जातं. या खास बटाट्यांची शेती ही फ्रान्समधील  Ile de Noirmoutier या बेटावर केली जाते. आश्चर्यकारक बाब म्हणजे या बटाट्यांची शेती या संपूर्ण बेटावर नाही तर तेथील केवळ ५० चौरस मीटर एवढ्या छोट्या क्षेत्रामध्ये केली जाते. वर्षातील केवळ १० दिवसच हे बटाटे लोकांना उपलब्ध असतात. या बटाट्यांना विशिष्ट्य अशी चव आहे. त्यांचा वापर सलाड आणि भाजी म्हणूनही केला जातो.

या बटाट्यांच्या किमतीमध्ये तुम्ही अनेक महागड्या वस्तू खरेदी करू शकता. मात्र एवढे महाग असूनही हे बटाटे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होते. हे बटाटे पिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच त्यांना जमिनीतून बाहेर काढताना अलगतपणे बाहेर काढावे लागते. अन्यथा ते खराब होतात. काही रिपोर्टनुसाप या बटाट्यांचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात, असा दावा केला जातो.  

Web Title: These potatoes are sold at the price of gold, the price of one kilo makes eyes widen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.