'या' सात विचित्र गोष्टी ज्या फक्त जापानमध्येच अस्तित्वात आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:22 PM2021-06-04T18:22:15+5:302021-06-04T18:25:20+5:30
जपानमधील संशोधक आपल्या क्रिटीव्हिटीने असे काही शोध लावतात की जग तोंडात बोटे घालेल. चला तर पाहूया अशा 7 गोष्टी ज्या केवळ जपानमध्येच पाहायला मिळतील...
जपानची तंत्रज्ञानातील कामगिरी ही जगातील सर्व राष्ट्रांच्या पुढे आहे. त्यातही काही जपानी शोध प्रचंड विचित्र आहेत. जपानमधील संशोधक आपल्या क्रिटीव्हिटीने असे काही शोध लावतात की जग तोंडात बोटे घालेल. चला तर पाहूया अशा 7 गोष्टी ज्या केवळ जपानमध्येच पाहायला मिळतील...
कडल कॅफे : जपानमध्ये कडल कॅफेची फार प्रसिद्ध आहेत. जपानी लोक सर्वात जास्त वेळ मेहनत करतात. त्यामुळे कडल कॅफे लोकांना आराम देण्यासाठी बनवण्यात आले आहेत. या ठिकाणी ते आपल्या जोडीदाराला सहज मिठी मारू शकतात. यामुळे जपानमधील नागरिक कधीही आपल्या जोडीदारासोबत कडल करू शकतात.
शिबुया क्रॉसिंग : शिबुया क्रॉसिंग हे जगातील सर्वात व्यस्त असणारे क्रॉसिंग आहे. आज हेच आशियाई संस्कृतीचा एक ठेवा बनले आहे.
ऑक्टोपस चवीचे आईस्क्रीम : अनेक देशांमध्ये ऑक्टोपस खाल्लं जातं. पण, आपण कधीही ऑक्टोपस फ्लेवर्ड आईस्क्रीमची चव घेतली आहे का? जपानमधील सीफूड प्रेमी या ऑक्टोपस आईसक्रीमचा अगदी मनसोक्त आनंद घेतात.
वेंडिंग मशीन : जपानमध्ये ५ दशलक्षाहाहूनही जास्त वेंडिंग मशीन्स आहेत. तेथे प्रत्येक २३ लोकांसाठी १ वेंडिंग मशीन आहे. तसेच जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी वेंडिंग मशीन आहे. यामध्ये स्नॅक्स, मासिके, टॉयलेट पेपर, फुले व छत्र्या इत्यादी गोष्टींचा देखील समावेश आहे. जपानमधील जवळजवळ प्रत्येक रस्त्यावर वेडिंग मशीन उपलब्ध आहेत.
जगातील सर्वात लहान एस्केलेटर : जगातील सर्वात लहान एस्केलेटर जपानमधील एका डिपार्टमेंट स्टोअरमध्ये आहे. त्यामुळे या देशाचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे. हा एस्केलेटर केवळ ८३४ मिमी लांब आहे.
नूडल्स खाताना ' स्लर्प' आवाज : जपानमध्ये नूडल्स खाताना ' स्लर्प' चा आवाज काढण्यात काहीच गैर नाही उलट ते चांगले मानले जाते. म्हणून, जपानमधील कोणत्याही रेस्टॉरंट्समध्ये 'स्लर्प'चा आवाज काढत आपण बिनधास्त नूडल्स खाऊ शकता.
कामावर पॉवर नॅप : जपानमध्ये कामाच्या दरम्यान पावर नॅप म्हणजेच काही वेळासाठी झोपण्यास परवानगी आहे. त्यांच्यामते असे केल्याने काम अधिक वेगाने होते.