कार हॅक करणाऱ्या दोघांना मिळाली ४६ लाखांची कार अन् २ कोटी रूपयांचं रोख बक्षिस!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:37 PM2019-03-25T13:37:02+5:302019-03-25T13:42:28+5:30
टेस्ला या वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या कारबाबत तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. कधी कुठेही कारही पाहिली असावी.
(Image Credit : Indiatimes.com)
टेस्ला या वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या कारबाबत तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. कधी कुठेही कारही पाहिली असावी. या कारची किंमत आणि डिझाइन नेहमीच चर्चेत असते. कारण ही कार एलोन मस्कने तयार केली आहे. ही कार हॅक करताच येणार नाही असा दावा करण्यात येत होता.
पण दोन तरूणांनी ही कार हॅक करून दाखवली. आणि त्यांनी कार हॅक केल्याचं मिळालेलं बक्षिस वाचून तुम्हीही थक्क व्हाल. दोघांना २ कोटी रूपये कॅश आणि टेस्लाची एक ४६ लाख रूपये किंमतीची कार देण्यात आली.
Hack a Tesla challenge success! Team @fluoroacetate infiltrated the infotainment system to win the car and cash. Congrats! #Pwn2Own#cansecwestpic.twitter.com/hO3iE0A9rz
— Andrew Spottswood (@aspottswood) March 22, 2019
Pwn2own ही एक ग्लोबल इव्हेंट कंपनी आहे. ही कंपनी मोठमोठ्या हॅकर्सना बोलावते आणि त्यांना चर्चेत असलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हॅक करण्याचं चॅलेन्ज देते. याचा इव्हेंटमध्ये हे दोन तरूण आले होते. Amat Cama आणि Richard Zhu अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी इंटरनेट ब्राऊजरच्या माध्यमातून टेस्लाची मॉडल ३ कार हॅक केली.
इतकेच नाही तर या दोघांनी टेस्ला कार हॅक करण्यासोबतच केवळ चार मिनिटांमध्ये सफारी ब्राउजर ही कार सुद्धा हॅक केली. या दोघांना याच कारनाम्यासाठी २.६ कोटी रूपयांचं बक्षिस आणि ४८ लाख रूपयांची टेस्ला कार मिळाली.