'या' अनोख्या डोअर हॅंडलने पुन्हा पुन्हा साबणाने हात धुण्याचा वाचेल त्रास, जाणून घ्या कसा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 03:12 PM2019-10-11T15:12:45+5:302019-10-11T15:17:06+5:30

काही दिवसांपूर्वीच एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, वॉशरूमच्या डोअर हॅंडलवर खूप सारे कीटाणू असतात. त्यामुळे सतत लोकांना हात स्वच्छ करण्यासाठी साबणाने धुवावे लागतात.

These two students invent self Sanitizing door handle | 'या' अनोख्या डोअर हॅंडलने पुन्हा पुन्हा साबणाने हात धुण्याचा वाचेल त्रास, जाणून घ्या कसा...

'या' अनोख्या डोअर हॅंडलने पुन्हा पुन्हा साबणाने हात धुण्याचा वाचेल त्रास, जाणून घ्या कसा...

Next

काही दिवसांपूर्वीच एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, वॉशरूमच्या डोअर हॅंडलवर खूप सारे कीटाणू असतात. त्यामुळे सतत लोकांना हात स्वच्छ करण्यासाठी साबणाने धुवावे लागतात. पण ही समस्या आता दूर होऊ शकते. १७ वर्षाच्या सुन मिंग आणि १८ वर्षीय किंग पोंग हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात. या दोघांनी टायटॅनियम डीऑक्साइडवर रिसर्च केलाय. त्यांच्या लक्षात आलं की, यापासून डोअर हॅंडल तयार केलं तर लोकांचं जीवन बदलू शकतं.

हात धुण्याची पडणार नाही गरज

त्यांना असं आढळलं की, टायटॅनियम बॅक्टेरिया मारण्यासाठी मदत करतं. यातून निघणारे यूवी किरणं एकप्रकारे हाताला सॅनिटाइज करतात. त्यांनी काचेच्या एका साच्यात टायटॅनियम टाकलं आणि ते बंद केलं. याला जे कुणी हात लावेल त्यांचे हात सॅनिटाइज होतील. म्हणजे बॅक्टेरिया मुक्त होतील.

लाइटने नष्ट होतील बॅक्टेरिया

मिंग आणि पोंग यांनी सांगितले की, जास्तीत जास्त बॅक्टेरिया हाताच्या माध्यमातूनच पसरतात. आपण लोकांच्या सपंर्कात येतो आणि आजारी पडतो. ते सांगतात की, आज पब्लिक प्लेस बॅक्टेरियामुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. अशात त्यांची ही पद्धत फार वेगळी आहे. जर याचा वापर डोअर हॅंडल म्हणून केला तर दरवाज्यावर बॅक्टेरियाच राहणार नाही.

मिंग आणि पोंग यांचा हा प्रोजेक्ट James Dyson Awards साठी पाठवण्यात आला आहे. आता वैज्ञानिक यावर काय प्रतिक्रिया देतात हे बघावं लागेल आणि या डोअर हॅंडलचा किती फायदा होईल.


Web Title: These two students invent self Sanitizing door handle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.