चोरी करून 'तो' ट्रेनने जात होता, पोलीस विमानाने त्याच्या मागे गेले अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:53 PM2019-11-08T12:53:23+5:302019-11-08T12:55:27+5:30
सामान्यपणे कुठे चोरी झाली तर पोलीस येतात, काही पुरावे शोधतात. त्यानंतर चोरांचा तपास सुरू करतात.
सामान्यपणे कुठे चोरी झाली तर पोलीस येतात, काही पुरावे शोधतात. त्यानंतर चोरांचा तपास सुरू करतात. अनेक दिवसांच्या शोधानंतर कधी चोर पकडले जातात तर कधी तसेच मोकाट असतात. पण बंगळुरूमध्ये एक २२ वर्षाच्या तरूणाने त्याच्या मालकाच्या घरात चोरी केली आणि अजमेर ट्रेनमध्ये बसला. सामान्यपणे असं असतं की, पोलीस उशीरा पोहोचतात आणि चोर तेवढ्यात फरार होतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चोरी केलेल्या पैशांनी काय काय करावे याची स्वप्न रंगवत असतानाच चोर कुशल सिंह याला झटका बसला. कारण अजमेर पोलीस स्टेशनवर पोलीस त्याची वाट बघत बसले होते.
बंगळुरूहून ट्रेनने अजमेरला पोहोचण्यासाठी ३ दिवस लागतात आणि पोलिसांनी वेळ न घालवता फ्लाइट पकडली. त्यामुळे ते वेळेत चोराला पकडू शकले. पण अशाप्रकारे इतक्या तातडीने फ्लाइटला जाऊन चोराला पकडल्याने या घटनेची चर्चा रंगली आहे.
कुशल हा Mehak. V. Piragal यांच्या घरी दिवाळीच्या दिवशी काम करत होता. त्याच दिवशी पिरागल यांनी कुशलला घराकडे लक्ष देण्याचे सांगितले आणि ते दुकानात पूजा करण्यासाठी गेले होते. रात्री ९ वाजता घरी परतल्यावर त्यांना दिसलं की, सगळं अस्ताव्यस्त पडलं आहे. घरातील सोन्याचे दागिने गायब होते.
जराही वेळ न घालवता त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच यावर कारवाई सुरू केली आणि माहिती मिळवली की, कुशलने अजमेर ट्रेन पकडली. तो पोहोचण्याआधीच पोलीस अजमेरला पोहोचले आणि त्याला पकडले. पोलिसांनी सांगितले की, कुशलचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये.