चोरी महागात पडली! छतावरून पळता पळता चोर कोसळला; भिंतीला लटकला अन् मग... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:50 AM2022-01-27T11:50:47+5:302022-01-27T11:54:48+5:30

छतावरून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना चोर पडला; बराच वेळ भिंतीला लटकला

Thief Trying To Escape Hangs On Wall In Chandigarh Falls Gets Injured Watch Viral Video | चोरी महागात पडली! छतावरून पळता पळता चोर कोसळला; भिंतीला लटकला अन् मग... 

चोरी महागात पडली! छतावरून पळता पळता चोर कोसळला; भिंतीला लटकला अन् मग... 

Next

चंदीगढ: सिटी ब्यूटीफुलच्या सेक्टर ४४ मध्ये एक अजब घटना घडली आहे. मंडई परिसरात एक चोर शिरला होता. तो चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला कोणीतरी पाहिलं. पकडले जाण्याच्या भीतीनं चोरानं तिथून पळ काढला. मात्र पळता पळता तो पडला आणि भिंतीवर लटकला. त्यानंतर त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाले. खाली बरीच गर्दी जमली.

चोरी करण्यासाठी आलेला चोर भिंतीला पटकला असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. बराच वेळ लटकलेला चोर खाली पडला. त्यात त्याला दुखापत झाली. पोलिसांनी चोराला सेक्टर ३२ मध्ये असलेल्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेल्या चोरासोबत त्याचा एक साथीदारदेखील होता. मात्र तो पळून गेला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं. न्यायमूर्तांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र भिंतीवरून पडल्यानं त्याला दुखापत झाली असल्यानं रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना न्यायमूर्तींनी पोलिसांना दिल्या. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येईल.

सेक्टर ४५ मध्ये वास्तव्यास असलेला विकास त्याच्या साथीदारासोबत सेक्टर ४४ मध्ये चोरी करण्यासाठी गेला होता. विकास घराच्या छतावर असताना त्याला कोणीतरी पाहिलं. त्यामुळे विकासनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो छतावरून पडला आणि भिंतीवर लटकला. काही वेळानंतर तो जमिनीवर पडून जखमी झाला.

Web Title: Thief Trying To Escape Hangs On Wall In Chandigarh Falls Gets Injured Watch Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.