फिल्मी स्टाइलने झाली इतिहासातील सर्वात मोठी चोरी, प्रदर्शनातून हिऱ्यांरे हार लंपास!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:20 PM2019-11-27T12:20:56+5:302019-11-27T12:27:42+5:30
बॉलिवूड असो वा हॉलिवूडच्या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण अनेक आश्चर्यकारक चोरी बघितल्या आहेत. चोरी म्हटलं की, हॉलिवडूच्या Ocean सीरिजमधील सिनेमांची लगेच आठवणही येते.
(Image Credit : reuters.com)
बॉलिवूड असो वा हॉलिवूडच्या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण अनेक आश्चर्यकारक चोरी बघितल्या आहेत. चोरी म्हटलं की, हॉलिवडूच्या Ocean सीरिजमधील सिनेमांची लगेच आठवणही येते. अशीच एक फिल्मी स्टाइलने प्रत्यक्षात चोरी झाली आहे. या चोरीबाबत असं म्हटलं जातं की, दुसऱ्या महायुद्धानंतर ही इतिहासातील सर्वात मोठी चोरी आहे.
(Image Credit : mercurynews.com)
जर्मनीतील ड्रेस्डनच्या द्रीन वॉल्ट संग्रहालयातून अनमोल हिऱ्याचा हार चोरी गेला आहे. हा हिऱ्यांचा हार Europe's Treasure Collection मध्ये लोकांना बघण्यासाठी ठेवण्यात आला होता. या हारासोबतच तिथे ठेवण्यात आलेल्या १० ज्वेलरी सेटमधील ३ ची चोरी झाली आहे.
(Image Credit : thesun.co.uk)
The Guardian ने दिलेल्या रिपोर्टनुसार, सोमवारी ग्रीन वॉल्टच्या एका भागात चोरी करण्याच्या उद्देशाने आग लावण्यात आली होती. त्यामुळे विजेचं कनेक्शन कापण्यात आलं होतं आणि चोरी करताना सिक्युरिटी अलार्मही वाजला नाही. चोर लोखंडाची ग्रील तोडून आत घुसले होते.
(Image Credit : thesun.co.uk)
BBC च्या एका रिपोर्टनुसार, चोरी झालेल्या प्रत्येक ज्वेलरी सेटमध्ये ३७ आयटम होते. आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हे दागिने विकण्यासाठी आधी तोडले जातील.
ड्रेस्टनच्या स्टेट आर्ट कलेक्शनचे Marion Ackermann म्हणाले की, चोरी झालेल्या हारांची अंदाजे किंमत लावणं शक्य नाही. कारण ते विकणे अशक्य आहे.