यशस्वी लोक कधीही करत नाहीत या 10 गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 12:26 PM2018-06-05T12:26:45+5:302018-06-05T12:27:28+5:30
काही चुका तुम्हाला तुमच्या यशापासून दूर नेतात. त्यामुळे त्या चुका टाळणं फार गरजेचं असतं. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका....
(Image Credit : inversk.co.ke)
जीवनात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचं असतं. पण कोणत्याही मेहनतीशिवाय यश मिळत नाही. काही लोक खूप मेहनत करतात पण त्यांना योग्य दिशा न मिळाल्याने त्यांना यश मिळत नाही. काही चुका तुम्हाला तुमच्या यशापासून दूर नेतात. त्यामुळे त्या चुका टाळणं फार गरजेचं असतं. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका....
- असे म्हणतात की, 90 टक्के लोकांना हे माहीत असतं की, यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं. पण काही लोक केवळ या गोष्टींचा विचार करतात. त्यावर काम काहीच करत नाही. यशस्वी लोक हळूहळू का होईना त्यांची स्वप्ने पूर्ण करत राहतात. काहीना काही करत राहतात.
- असे म्हणतात की, सुरुवात सर्वात कठीण असते. अनेकजण उत्साहात काम सुरु करतात, पण यश न मिळाल्याने निराश होतात. असे कधी करु नये. सर्वातआधी आपल्याला जीवनात काय करायचं आहे, हे माहीत असायला हवं. त्यानंतर त्या दिशेने पाऊल टाका.
- स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद खूप मोठा आनंद असतो. पण त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. काही लोक हे जास्त डोक्याला जास्त ताप करुन न घेता कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतात. हे असं करणं टाळायला हवं. तुम्ही जर ठरवलं तर तुमच्या पायाशी लोटांगण घालू शकतं.
- काही लोकांना एका काळानंतर असं वाटायला लागतं की, त्यांना सगळ्यातील सगळं माहीत आहे. त्यांना यशस्वी होण्याचं सूत्र माहीत आहे. पण असा विचार करणे चुकीचे आहे. यशस्वी लोक नवीन गोष्टींचं ज्ञान घेण्यासाठी सतत तयार असतात. सतत नवीन काहीतरी शिकत असतात.
- यशस्वी लोक स्वत:च्या चुकांकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत. अपयशी लोक हे सतत त्यांच्या अपयशाचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडत असतात. पण यशस्वी लोक स्वत:च्या चुकांची जबाबदारी घेतात आणि त्या सुधारतातही.
- प्रत्येकजण आपल्या आयुष्यात चुका करत असतो. पण त्या चुकांमधून जे धडा घेतात त्यांचा फायदा होते. ते पुन्हा तशा चुका करत नाहीत. त्यामुळे आपल्या चुकांमधून नेहमी काहीतरी शिकायला हवं.
- कोणत्याही प्लॅनिंगशिवाय काम करणे म्हणजे पॅराशूटशिवाय विमानातून उडी घेण्यासारखे आहे. त्यामुळे काहीही छोट्यातलं छोटं काम करतानाही त्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे. असे केल्यास ते काम पूर्णत्वास जाऊ शकतं.
- तुम्हाला जर वाटत असेल की, सगळं काम तुम्ही एकटेच करु शकता. तर तुम्ही चुकीचा विचार करताय. यशस्वी लोकांना लोकांकडून काम करवून घेणं चांगल्याप्रकारे येतं.
- यशस्वी लोक कधीही अशक्य या शब्दाचा वापर करत नाहीत. भलेही काम न होवो पण ते नकारात्मक विचार करत नाहीत. एकदा प्रयत्न नक्की करतात.