तिसरीतली मुलगी चालवते गरीब मुलांसाठी बाल पुस्तकालय
By Admin | Published: March 11, 2016 04:45 PM2016-03-11T16:45:33+5:302016-03-11T16:45:33+5:30
तिसऱ्या इयत्तेत शिकणारी 9 वर्षांची मुस्कान अहिरवार ही मुलगी झोपडपट्टीतल्या मुलांसाठी वाचनालय चालवते.
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 11 - तिसऱ्या इयत्तेत शिकणारी 9 वर्षांची मुस्कान अहिरवार ही मुलगी झोपडपट्टीतल्या मुलांसाठी वाचनालय चालवते. शाळा सुटली की मुस्कान तिच्याकडे असलेली 119 पुस्तकं घराबाहेर मांडते. त्यातल्या गोष्टी ती मोठ्या मोठ्याने वाटते. त्यामुळे बाजुच्या झोपडपट्टीतली मुलं गोळा होतात. ज्या मुलांना वाचायला शिकायचंय किंवा ज्यांना वाचायला आवडतं त्यांनी पुस्तक घेऊन जावं असंही ती त्यांना सांगते.
तिच्या या वाचनालयाला राज्याच्या शिक्षण मंडळानेही बाल पुस्तकालय असा दर्जा दिला आहे. मित्र-मैत्रिणींनो या पुस्चकं वाचुया आणि जग जाणून घेऊया अशी साद ही तिसरीतली मुलगी गरीबांच्या मुलांना घालते आणि आपल्या परीने ज्ञानयज्ञ पेटता ठेवते.