मुलं जन्माला घाला अन् सरकारकडून बम्पर पैसे मिळवा; या देशात ११४८ कोटींच्या सबसिडीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 11:39 AM2023-07-01T11:39:15+5:302023-07-01T11:43:10+5:30
कंपनीने लोकसंख्या वाढीसाठी या खास सबसिडीची घोषणा केली आहे.
China : चीनमधून नेहमीच वेगवेगळ्या अजब घटनांबाबत माहिती समोर येत असते. कधी लग्नाबाबत तर कधी मुलांबाबत. आता चीनच्या एका कंपनीने आपल्या 32 हजार कर्मचाऱ्यांना मुलांना जन्म देण्यासाठी 1148 कोटी रूपये सब्सिडीची घोषणा केली आहे. Trip.com नावाची चीनी कंपनी जगातल्या सगळ्यात मोठ्या ट्रॅव्हल एजन्सीपैकी एक आहे. या कंपनीने 1 बिलियन युआनची नवीन चाइल्डकेअर सब्सिडीची घोषणा केली आहे.
भारतीय करन्सीमध्ये ही रक्कम 11,48,87,08,000 रूपये इतकी होते. जे कर्मचारी कमीत कमी तीन वर्षापासून कंपनीत आहेत त्यांना मुलाच्या पहिल्या वाढदिवसापासून पाच वर्षाचा होईपर्यंत दरवर्षी प्रत्येक नव्या बाळासाठी 10, 000 युआन म्हणजे 112918 रूपयांचा वार्षिक बोनस मिळेल
Trip.com चे कार्यकारी अध्यक्ष जेम्स लियांग यांनी सांगितलं की, या नव्या चाइल्ड केअर पॉलिसीच्या माध्यमातून आमचं लक्ष्य कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करणं आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना यामाध्यमातून आपला परिवार सुरू करणे आणि वाढवण्यास प्रोत्साहन मिळेल.
चीन लोकसंख्या घटली
चीनची लोकसंख्या 60 वर्षात पहिल्यांदा 2022 मध्ये घटली आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, चीन आता जगातला दुसरा सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. यावर्षी भारताने लोकसंख्येच्या बाबतीच चीनला मागे सोडलं आहे.
कुणाला मिळणार बोनस
कंपनीने सांगितलं की Trip.com साठी तीन वर्षापासून काम करणारे सर्व पूर्णकालिक कर्मचारी बोनससाठी योग्य असतील. मग त्यांचा लिंह, पद किंवा नोकरी काहीही असो. लियांग म्हणाले की, मी नेहमीच सल्ला दिला आहे की, सरकारने मुलं असलेल्या परिवाराला पैसे द्यावे. याने त्यांना आणखी मुलांना जन्म देण्यास मदत मिळेल.