'या' फिल्ममेकरने महिनाभर खाल्ले फक्त मॅकडॉनल्ड्सचे पदार्थ, मग झालं असं काही वाचून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:12 PM2024-08-02T14:12:18+5:302024-08-02T14:20:10+5:30
आपली डॉक्युमेंट्री "सुपर साइज मी" मध्ये त्यानी जवळपास ३० दिवस केवळ मॅकडॉनल्ड्सचे पदार्थ खाल्लेत. तेही दिवसातून ३ वेळा. या त्यानी डॉक्युमेंटशन केलं, ज्याचे निष्कर्ष फारच धक्कादायक होते.
सिने निर्माता मॉर्गन स्परलॉक (Filmmaker Morgan Spurlock) ने २००४ मध्ये फास्ट फूड खाण्याच्या सवयीचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी एक प्रयोग केला. आपली डॉक्युमेंट्री "सुपर साइज मी" मध्ये त्यानी जवळपास ३० दिवस केवळ मॅकडॉनल्ड्सचे पदार्थ खाल्लेत. तेही दिवसातून ३ वेळा. या त्यानी डॉक्युमेंटशन केलं, ज्याचे निष्कर्ष फारच धक्कादायक होते.
स्परलॉक यानी स्वत:साठीच काही नियम करून घेतले होते. मॅकडॉनल्ड्सच्या मेन्यूमधील प्रत्येक पदार्थ किमान एक वेळी तरी खायचा. फास्ट फूड खाण्याच्या या प्रयोगाच्या पाचव्या दिवशी त्यांचं वजन ९.५ पाऊंड वाढलं होतं. २१ व्या दिवसापर्यंत त्यांचं वजन २४.५ पाऊंडने वाढलं होतं. त्यांचं कोलेस्ट्रॉल 168 ते 230 झालं होतं. तसेच त्यांच्या शरीरात फॅटचं प्रमाण ११ टक्के ते १८ टक्के झालं होतं.
"सुपर साइज़ मी" चं शूटिंग एक महिना चाललं. इतके दिवस त्यांनी केवळ फास्ट फूड खाल्ले. यासाठी त्यांना ६५ हजार डॉलर इतका खर्च आला. या प्रयोगादरम्यान त्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या झाल्यात. डोकेदुखी, तणाव, मूडमध्ये चढउतार, कामेच्छा कमी होणे अशा समस्या जाणवल्या. पण डॉक्टरांना सगळ्यात जास्त चिंता होती ती त्यांच्या लिव्हरची. कारण लिव्हरवर फॅट वाढतच चाललं होतं. तसेच स्परलॉक यांना हे पदार्थ खाण्याची लालसा आणि जर ते खाल्ले नाही तर सुस्ती जाणवत होती.
या डॉक्युमेंट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच यावर आक्षेपही घेण्यात आला होता. या फिल्मने २२ मिलियन डॉलरपेक्षा जास्त कमाई केली होती. या फिल्मच्या माध्यमातून वैश्विक स्तरावर फास्ट फूडबाबत चर्चा सुरू झाली होती. स्परलॉ़क यांनी प्रयोगातून फास्ट फूडच्या सवयीबाबत दाखवलं आणि लोकांची खाण्याची सवय बदलली. "सुपर साइज मी" डॉक्युमेंट्रीला सर्वौत्कृष्ट फीचरसाठी ऑस्करमध्ये नामांकन मिळालं होतं.