याची तर वेगळीच डोकेदुखी! कार-बंगला, करोडोंचा बँक बॅलन्स, पण आई-बापाला सांगू शकत नाहीय...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 03:10 PM2023-03-13T15:10:00+5:302023-03-13T15:11:26+5:30
गोष्ट आहे एका २६ वर्षीय उद्योजकाची. McLaren, Mercedes सारख्या कार, महिन्याला १ कोटी रुपयांची कमाई...
आजकाल पैसा कोणाला नकोय, सारेच मिळेल त्या मार्गाने पैशांच्या मागे धावत आहेत. परंतू, यात असेही काही आहेत ज्यांना चांगल्या मार्गानेच पैसा हवा आहे. वरचा पैसा येत असेल तर त्यांच्या ते तत्वात बसत नाही. अशीच अडचण एका तरुणाची झाली आहे. त्याच्याकडे करोडोंच्या कार-बंगला आणि करोडोंमध्येच बँक बॅलन्स आहे, परंतू तो त्याच्या आईवडिलांना सांगू शकत नाहीय.
गोष्ट आहे एका २६ वर्षीय उद्योजकाची. द मिररनुसार या तरुणाचे नाव ग्यूसेप फिओरेंटीनो (Giuseppe Fiorentino) आहे. तो ECOMVERSE | 3CC STUDIOS नावाच्या कन्सल्टिंग एजन्सीचा संस्थापक आहे. त्याचे आईवडील वाढती गुन्हेगारी पाहून इटलीची सीसीली सोडून स्वित्झर्लंडला गेले होते. तेव्हा ग्युसेप लहान होता. २६ वर्षांचा होता होता त्याने ई-कॉमर्स वेवसाईटवरून करोडो रुपये कमावले.
एवढ्या लहान वयात एवढा पैसा कसा आला असा प्रश्न आई-वडिलांना पडेल. याने नक्कीच काळाबाजार, गुन्हेगारी करून हा पैसा मिळवला असेल असे त्यांना वाटेल आणि ते त्याला आपल्यापासून दूर करतील, अशी भीती ग्युसेपला वाटत आहे.
ते मला माफिया किंवा गुन्हेगार समजतील, या भीतीने मी माझ्याकडे कार, बंगला, पैसा असल्याचे आई-वडिलांना सांगू शकत नाहीय. मी चुकीच्या मार्गाने पैसा कमावलाय असे त्यांना वाटेल. मी खूप वेगाने पैसे कमावले आहेत, यामुळे त्यांना याचा संशय येईल, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.
ग्युसेपचे इन्स्टावर जवळपास ५० हजार फॉलोअर्स आहेत. एवढी संपत्ती मी वडिलांना सांगितली तर ते ती समजून घेऊ शकणार नाहीत. त्यांनी कधीही ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन व्यवसायाबद्दल ऐकलेले नाहीय. मी माझ्या व्यवसायातून महिन्याला एक कोटी रुपये कमवत आहे. माझ्याकडे McLaren, Mercedes सारख्या कार आहेत. सिसीलीमध्ये अनेक लोक श्रीमंत आहेत, परंतू त्यांनी चुकीच्या मार्गाने पैसा जमविलेला आहे. यामुळे माझ्या आई-वडिलांनाही माझ्यावर संशय येईल, असे तो म्हणतो.