भन्नाट गाव! घराघरात एकतरी युट्यूबर; एकाने तर SBI मधील नोकरी सोडली, एवढी कमाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 12:03 PM2022-09-01T12:03:47+5:302022-09-01T12:12:34+5:30
जर तुम्ही या गावात गेलात तर तुम्हाला रस्त्यावर लोक व्हिडीओ बनवताना सहज दिसतील. गावातील लोकच सांगतात की 85 वर्षांच्या आजीपासून ते 15 वर्षांच्या नातवापर्यंत सर्व व्हिडिओसाठी ते अभिनय करतात. ज
आजकाल व्हिडीओ बनवण्याची क्रेझ खूप वाढली आहे. प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की YouTuber बनणं ही एक मोठी कमाई आहे. देशात एक असं गाव आहे जिथे प्रत्येक घरात एक YouTuber आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून तिल्दा परिसर जवळपास 45 किमी अंतरावर तुळशी गाव आहे. विशेष म्हणजे या गावात घराघरात एकतरी युट्यूबर आहेच. इंडिया टाईम्सनुसार, या गावाची लोकसंख्या 3000 आहे. या तीन हजार लोकांपैकी एक हजारांहून अधिक लोक युट्युबर आहेत यावरून तुम्हाला युट्यूबची क्रेझ समजू शकते.
जर तुम्ही या गावात गेलात तर तुम्हाला रस्त्यावर लोक व्हिडीओ बनवताना सहज दिसतील. गावातील लोकच सांगतात की 85 वर्षांच्या आजीपासून ते 15 वर्षांच्या नातवापर्यंत सर्व व्हिडिओसाठी अभिनय करतात. ज्ञानेंद्र शुक्ला आणि जय वर्मा हे दोघेही याच गावातील रहिवासी आहेत. आज दोघे युट्यूबवर व्हिडीओ बनवतात. दोघांनीही नोकरी सोडली आणि त्यानंतर युट्यूब चॅनल सुरू करून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
ज्ञानेंद्र सरकारी नोकरी करायचा. तो एसबीआयमध्ये नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम करत होता. आतापर्यंत त्याने तब्बल 250 व्हिडीओ बनवले आहेत आणि त्याच्या चॅनेलवर 1.15 लाख सब्सक्राइबर्स आहेत. जय वर्मा यांनी एम.एस्सी केली असून ते मुलांना शिकवायचे. यातून त्यांना 15 ते 20 हजार रुपये मिळायचे. मात्र त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून त्यांना या चॅनलमधून दरमहा 30 ते 35 हजार रुपयांची कमाई होत आहे. या दोघांना पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी YouTube साठी कंटेंट बनवायला सुरुवात केली.
पिंकी साहू एक कलाकार आहे. तिने सांगितलं की, जेव्हापासून येथे व्हिडिओ कंटेंट बनवण्याची क्रेझ वाढली आहे, तेव्हापासून महिलांना भरपूर काम मिळू लागले आहे. या व्हिडिओमध्ये ती दीड वर्षांपासून अभिनय करत आहे. जरी महिला घरासमोर फारशा बाहेर पडल्या नाहीत. मात्र यूट्यूबच्या माध्यमातून परिसरातील लोकांच्या विचारात बदल झाला आहे. महिलाही व्हिडिओजमध्ये सहभागी होऊन उत्तम अभिनय करू लागल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.