ट्रॅफिकमध्ये अडकले, प्रेमात पडले अन् सात जन्माचे सोबती झाले; अशी होती 'प्यारवाली लव्हस्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 08:08 PM2022-09-21T20:08:17+5:302022-09-21T20:09:40+5:30

ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे एक लव्हस्टोरी सुरू झाली असून सध्या तिची तुफान चर्चा रंगली आहे.

this man fell in love and got married all thanks to bengaluru traffic his cute lovestory goes viral | ट्रॅफिकमध्ये अडकले, प्रेमात पडले अन् सात जन्माचे सोबती झाले; अशी होती 'प्यारवाली लव्हस्टोरी'

ट्रॅफिकमध्ये अडकले, प्रेमात पडले अन् सात जन्माचे सोबती झाले; अशी होती 'प्यारवाली लव्हस्टोरी'

Next

बंगळुरूच्या ट्रॅफिक जामबाबत आपण नेहमीच ऐकलं आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरच्या अनेक घटना, किस्से इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत. पण आता एक हटके घटना समोर आली आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे एक लव्हस्टोरी सुरू झाली असून सध्या तिची तुफान चर्चा रंगली आहे. रेडिटवर शेअर केलेली लव्हस्टोरी ट्विटरवरून व्हायरल झाली आहे. तरुणाने नेमकं काय झालं ते सांगितलं आहे. 

पोस्टमध्ये, प्रेमात पडलेल्या व्यक्तीने तो सोनी वर्ल्ड सिग्नलजवळ त्याच्या पत्नीला कसा भेटला हे लिहिलं आहे. एके दिवशी तो आपल्या पत्नीला घरी सोडण्यासाठी जात होता आणि बांधकाम सुरू असलेल्या एजीपुरा उड्डाणपुलामुळे ट्रॅफिक जाममध्ये कसा अडकला हे त्याने सविस्तरपणे पोस्टमध्ये सांगितले आहे. 

"आम्ही निराश झालो आणि भूक लागली होती, आम्ही निघालो आणि जवळच रात्रीचे जेवण केले." ते रात्रीचे जेवण दोघांमधील प्रेम फुलवण्यासाठी पुरेसे होते. मी तिला तेव्हापासून 3 वर्षे डेट केले आहे आणि आता आमच्या लग्नाला 2 वर्षे झाली आहेत, परंतु 2.5 किमी उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप सुरू आहे" असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

ट्विटर पोस्टला 4 हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. लोकही या गोड प्रेमकथेच्या प्रेमात पडले आहेत आणि प्रत्येकाने बंगळुरू ट्रॅफिकमधील त्यांच्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. सध्या याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: this man fell in love and got married all thanks to bengaluru traffic his cute lovestory goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.