ही आहे जगातील सगळ्यात महाग भाजी, जाणून घ्या नाव आणि किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:00 AM2023-03-28T10:00:47+5:302023-03-28T10:02:06+5:30
Expensive Vegetable : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही भाजी मुख्यपणे यूरोप आणि उत्तर अमेरिकेत मिळते. असं सांगण्यात येतं की, ही भाजी फुलाच्या झाडाची एक प्रजाती आहे.
Expensive Vegetable : आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक हिरव्या पालेभाज्या खाण्यावर जास्त भर देतात. बाजारात भाजी आणायला गेल्यावर स्वस्तात चांगल्या भाज्या मिळतात. फार फार तर 20 रूपये किंवा 30 रूपये किलो दराने भाज्या मिळतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, जगातली सगळ्यात महाग भाजी कोणती आहे आणि तिचे काय फायदे आहेत? चला जाणून घेऊ जगातल्या सगळ्यात महाग भाजीची किंमत आणि काय आहे तिचं नाव.
या भाजीचं नाव आहे हॉपशूट्स. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही भाजी मुख्यपणे यूरोप आणि उत्तर अमेरिकेत मिळते. असं सांगण्यात येतं की, ही भाजी फुलाच्या झाडाची एक प्रजाती आहे. या भाजीचं झाड 6 मीटर वाढू शकतं आणि 20 वर्ष जगतं.
हॉपशूट या भाजीची कापणी करण्यासाठी म्हणजे ही भाजी तयार होण्यासाठी तीन वर्षाचा वेळ लागतो. तसेच याच्या कापणीसाठी मोठं शारीरिक श्रम करावं लागतं. कापणी करताना फार काळजी घ्यावी लागते. या कारणाने याची किंमतीही जास्त राहत असेल. ही भाजी जगातली सगळ्यात महाग भाजी मानली जाते.
या भाजीमध्ये अनेक औषधी गुण आहेत. तसेच या भाजीच्या फुलांचा वापर बीअर तयार करण्यासाठी केला जातो. याचा वापर बीअर मेकिंगमध्ये स्टेबिलिटी एजंट म्हणून केला जातो. एका मेडिकल स्टडीनुसार, हे समोर आलं की, याची भाजी टीबी विरोधात अॅंटीबॉडी तयार करू शकते. सोबतच एंग्जाइटी, अस्वस्थता, तणाव, उत्तेजना, घबराहट आणि चिड़चिड़पणा यावर याने उपचार करता येतात.
या भाजीच्या किंमतीबाबत सांगायचं तर ही भाजी 85 हजार ते एक लाख रूपये प्रति किलो असते. भारतात याची शेती केली जात नाही. एक हिमाचल प्रदेशातील शेतांमध्ये एकदा ही लावली होती. पण त्यात यश मिळालं नाही. ही भाजी जास्त उपलब्धही नसते. त्यामुळे ती ऑर्डर देऊन मागवली जाते.