जगातील एक असं घड्याळ ज्यात कधीच वाजत नाही १२, कारण वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 12:40 PM2024-11-22T12:40:44+5:302024-11-22T12:52:48+5:30

A Clock on Town Square  : या शहराचं ११ नंबरशी वेगळंच नातं आहे. इथे प्रत्येक वस्तूच्या डिझाइनचा आणि या क्रमांकाचा काहीना काही संबंध आवर्जून असतो.

This watch never rings 12 in Switzerland town Solothurn | जगातील एक असं घड्याळ ज्यात कधीच वाजत नाही १२, कारण वाचून व्हाल अवाक्!

जगातील एक असं घड्याळ ज्यात कधीच वाजत नाही १२, कारण वाचून व्हाल अवाक्!

A Clock on Town Square  : सामान्यपणे सगळ्यांनाच हे माहीत आहे की, कोणत्याही घड्याळीमध्ये ११ वाजतानंतर १२ वाजतातच. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एका ठिकाणी असंही घड्याळ आहे ज्यात कधीच १२ वाजत नाही. 
स्वित्झर्लॅंडमधील सोलोथर्न हे शहर त्याच्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असतं. या शहराचं ११ नंबरशी वेगळंच नातं आहे. इथे प्रत्येक वस्तूच्या डिझाइनचा आणि या क्रमांकाचा काहीना काही संबंध आवर्जून असतो.

इथे असलेल्या चर्चेची संख्याही ११ आहे. ११ ऐतिहासिक झरे, ११ संग्रहालय आणि ११ टॉवर आहेत. येथील सेंट उर्सूसच्या मुख्य चर्चमध्ये तुम्हाला ११ क्रमांकासोबत लोकांचा विशेष स्नेह बघायला मिळेल. या चर्चचं बांधकाम ११ वर्षात करण्यात आलं होतं. इथे पायऱ्यांचे तीन सेट आहेत. प्रत्येक सेटमध्ये ११ पायऱ्या, ११ दरवाजे, ११ घंट्या आहेत. 
११ क्रमांकाचं येथील लोकांच्या जीवनात खास महत्त्व आहे. प्रत्येक ११व्या वाढदिवसाला इथे खास समारोहाचं आयोजन केलं जातं. प्रॉडक्टच्या नावांमध्ये ११ क्रमांक जुळला आहे. जसे की, ऑफी बिअर म्हणजेच बिअर ११, ११ आई चॉकोलेड(११ चॉकलेट).

घड्याळात वाजत नाही १२

अशाप्रकारच्या घड्याळाबाबत वाचून तर तुम्हीही आश्चर्यचकित झाले असाल. या शहरातील मुख्य चौकात एक घड्याळ आहे. या घड्याळात तासांच्या केवळ ११ रेषा आहेत. ११ यातून गायब आहे.

काय आहे कारण?

सोलोथर्नमधील लोकांना क्रमांक ११ सोबत इतका का जिव्हाळा आहे याच्या वेगवेगळ्या थेअरी आहेत. एका थेअरीनुसार, सोलोर्थनचे लोक फार मेहनत करतात, पण त्यांच्या जगण्यात आनंद नव्हता. काही काळाने शेजारच्या डोंगरातून पऱ्या येऊ लागल्या. त्या पऱ्या लोकांना प्रोत्साहन देत होत्या आणि त्यांचं कौतुक करत होत्या. याने लोकांमध्ये आनंद भरला गेला. 

पऱ्यांना तसं इंग्रजीमध्ये एल्फ म्हटलं जातं आणि जर्मन भाषेत एल्फचा अर्थ ११ होतो. लोकांनी अशाप्रकारे त्या पऱ्यांना ११ क्रमाकांशी जोडलं होतं आणि त्यांच्या उपकारांची आठवण म्हणून ११ क्रमांकाला महत्त्व देऊ लागले. दुसरी एक थेअरी सांगते की, याचा संबंध बायबलसोबत आहे. बायबलमध्ये ११ क्रमांकाला खास क्रमांक सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच येथील लोकांमध्ये या क्रमांकाबाबत खास प्रेम आहे. 

काय आहे इतिहास?

सोलोथर्नच्या इतिहासात ११ क्रमांकाचा उल्लेख पहिल्यांदा १२५२ मध्ये आढळतो. असे सांगितले जाते की, याचवर्षी शहराच्या काउन्सिलसाठी ११ सदस्यांची निवड करण्यात आली होती. नंतर १४८१ मध्ये सोलोथर्न स्विस संघाचा ११ वा क्रंटोन झाला. नंतर अनेक वर्षांनी याला ११ प्रॉटेक्टोरेट्समध्ये विभागण्यात आलं. या ठिकाणाच्या इतिहासात मध्यकाळात ११ समुदायांचा उल्लेखही आढळतो.

Web Title: This watch never rings 12 in Switzerland town Solothurn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.