आईला अंगठी देण्यासाठी जमविले हजारो रुपये, पण..!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:32 AM2019-03-03T02:32:52+5:302019-03-03T02:33:01+5:30
एका १० वर्षांच्या मुलाला आपल्या आईसाठी हिऱ्याची अंगठी विकत घ्यायची होती. त्याने इथूनतिथून कसेतरी ८८०० युआन (सुमारे ९४ हजार रुपये) जमा केले.
एका १० वर्षांच्या मुलाला आपल्या आईसाठी हिऱ्याची अंगठी विकत घ्यायची होती. त्याने इथूनतिथून कसेतरी ८८०० युआन (सुमारे ९४ हजार रुपये) जमा केले. त्यानंतर, तो आईला घेऊन ज्वेलरी शॉपमध्ये गेलाही. त्याने आईसाठी एक अंगठी निवडली, पण त्यानंतर त्याच्या आईने जे केलं, ते पाहून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. चीनमधील ही घटना आहे. या मुलानं नवीन वर्षाला लहान मुलांना खाऊ साठी मोठे लोक जे पैसे देतात, त्यातून इतकी सारी रक्कम जमा केली होती. मुलगा महागडी अंगठी आपल्यासाठी घेत आहे, हे पाहून तिथं तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच तो रडू लागला. त्यामुळे आईलाही त्याची कणव आली. तिनं त्याला शांत केलं आणि प्रेमानं मिठी मारली. त्यानंतर, आईसाठी त्याने त्याच्याकडे असलेल्या रकमेच्या किमतीची अंगठी निवडली. पण मुलाने हे पैसे असे खर्च करू नयेत, असं आईला वाटत होतं. त्यामुळे आईने अतिशय महागडी म्हणजेच तब्बल ५0 हजार युआन किमतीची एक अंगठी निवडली. आता इतके पैसे नसल्याने मुलगा नाराज झाला. त्यावर आई म्हणाली की, असं कर आणखी काही पैसे जमा कर आणि त्यानंतर माझ्यासाठी ही अंगठी खरेदी कर. त्यामुळे तो आता आणखी रक्कम जमा करीत असेल आणि त्याने जमविलेले पैसे वाचले, याचं आईला समाधान झालं असेल.