हजारो बेवारस सायकलींचे करायचे तरी काय?
By admin | Published: July 5, 2017 01:08 AM2017-07-05T01:08:53+5:302017-07-05T01:08:53+5:30
एकदम पाहिले तर हे चित्र खूप काही वेगळेच दिसेल. परंतु जवळून बघितले तर कित्येक हजारो सायकलींचे सांगाडे असल्याचे दिसते.
एकदम पाहिले तर हे चित्र खूप काही वेगळेच दिसेल. परंतु जवळून बघितले तर कित्येक हजारो सायकलींचे सांगाडे असल्याचे दिसते. पूर्व चीनच्या झेझियांग प्रांतातील हँगझोऊ येथील मैदानावर सुमारे ८४ हजार सायकली पोलिसांनी ठेवल्या आहेत. चीनमध्ये सायकली भाड्याने देण्याचा व्यवसाय वाढला आहे व सायकली या व्यवसायातील असल्या तरी बेवारस टाकून दिल्या गेलेल्या आहेत. बोरिस बाईक योजनाही अशीच आहे. या सायकली लोकांना (पहिला तास विनामूल्य) भाड्याने दिल्या जातात व शहरात जी २,७०० केंद्रे आहेत तेथे कुठेही ही सायकल जमा करण्यास सांगितले जाते. परंतु आळशी सायकलस्वार सायकल केंद्रावर जमा न करता त्यांना सायकलीची गरज नसते त्यावेळी ती कुठेही सोडून देतात.
कंपनी अशी सोडलेली सायकल तेथे जाऊन जमा करून घेण्यात फार उत्साह दाखवत नाही. कारण त्या सायकलींवर मालकीचा दावा करायचा तर असंख्य गोष्टी कराव्या लागतात.
ते कंपनी टाळते. सायकलींची ही स्मशानभूमीच बनली आहे. पोलिसांनी या बेवारस सायकली जमा करून एका ठिकाणी साठवून ठेवल्या व बघताबघता त्या ८४ हजार संख्येत गेल्या. या सायकलींचे नेमके काय होईल हे सांगता येणार नाही. यापुढे असे होणार नाही यासाठी या उद्योगाला कसे वळण लावायचे याचा विचार सरकार करीत आहे.