3 मीटर लांब, ६०० किलो वजन अन् ४ पायाच्या व्हेलचा शोध; वैज्ञानिकही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 04:42 PM2021-08-27T16:42:13+5:302021-08-27T16:45:04+5:30
सिन्हुआ एजन्सीने बुधवारी सांगितलं की, असं मानलं जातं की, इतिहासात पहिल्यांदाच अरब-इजिप्तच्या टीमने व्हेलच्या एका नव्या प्रजातीची नोंद केली आहे.
इजिप्तची राजधानी काहिराच्या रिसर्च मंत्रालयाने एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, जवळपास ४३ मिलियन (४ कोटी ३० लाख) वर्षाआधी अर्ध-जलीय व्हेल आढळून येत होत्या. या व्हेलला चार पायही होते. त्यांना इजिप्तमध्ये मृत्यूची देवता Anubis नावाने ओळखलं जात होतं.
सिन्हुआ एजन्सीने बुधवारी सांगितलं की, असं मानलं जातं की, इतिहासात पहिल्यांदाच अरब-इजिप्तच्या टीमने व्हेलच्या एका नव्या प्रजातीची नोंद केली आहे. जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, ३ मीटर लांब आणि ६०० किलोग्रॅम वजनासोबत व्हेल मासा जमिनीवर चालण्यासोबतच मगरीला आणि छोट्या काही जीवांप्रमाणे पाण्यात पोहोचण्यात सक्षम होता.
या रिसर्च टीमला सुपरवाइज करणाऱ्या मंसौरा यूनिव्हर्सिटी सेंटर फॉर वर्टेब्रेट फॉसिल्सचे चेअरमन हिशाम सल्लम म्हणाले की, 'पॅलियोन्टोलॉजिस्टसने २००८ मध्ये इजिप्तच्या फेयूम डिप्रेशनमध्ये एका अभियानादरम्यान व्हेलच्या अवशेषांचा शोध घेण्यात आला'.
ते म्हणाले की, टीमने इजिप्तच्या आत आणि बाहेर इतर व्हेलच्या नमून्यासोबत अवशेषांची तुलना केल्यानंतर रिसर्चची नोंदणी करण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी चार वर्षापर्यंत काम केलं. नव्या व्हेलचं नाव फियोमिसेटस एनबिस ठेवण्यात आलं आहे. तर प्राचीन इजिप्तच्या सभ्यतेत मृत्यू आणि ममीकरणाच्या देवतेच्या नावावर एनबिस हे नाव देण्यात आलं आहे.