असा समाज, जिथे अनेक भावांची एकच असते पत्नी; टोपीने केली जाते वेळेची वाटणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:12 PM2022-12-06T15:12:52+5:302022-12-06T15:13:40+5:30

Men share one wife : एक महिलेचे अनेक पती हे तिबेटमध्ये बघायला मिळतं. हा एक छोटा देश आहे. जो बऱ्याच काळापासून चीनच्या मनमानीचा सामना करत आहे. अशात जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे फारशी साधने नाहीत.

Tibetan community where several men share one wife | असा समाज, जिथे अनेक भावांची एकच असते पत्नी; टोपीने केली जाते वेळेची वाटणी!

असा समाज, जिथे अनेक भावांची एकच असते पत्नी; टोपीने केली जाते वेळेची वाटणी!

Next

Men share one wife : राज्यात सध्या जुळ्या मुलींसोबत लग्न करणाऱ्या तरूणाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हिंदू मॅक्ट मॅरेजनुसार एक पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जर लग्न करणाऱ्या तरूणींनाच काही हरकत नव्हती, तर गुन्हा दाखल होण्याचं काय कारण? या उलटही होतं. असे काही समाज आहेत, जिथे बहुपती रिवाज आहे. इथे एक पत्नी अनेक पतींसोबत एकाच घरात राहते.

एक महिलेचे अनेक पती हे तिबेटमध्ये बघायला मिळतं. हा एक छोटा देश आहे. जो बऱ्याच काळापासून चीनच्या मनमानीचा सामना करत आहे. अशात जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे फारशी साधने नाहीत. इथे जास्तीत जास्त लोक शेतकरी आहेत. जे छोटी शेती करून परिवाराचं पोट भरतात. अशात जर अनेक भाऊ असलेल्या परिवारात सगळ्यांचं लग्न झालं आणि मुलंही झाले तर छोट्या जमिनीचे अनेक हिस्से पडतील. 

एक तर्क असाही होता की, एक पती कामधंद्यासाठी बाहेर गेला तर घरीची देखरेख त्याच जबाबदारीने दुसरा पती करू शकतो. युनिवर्सिटी ऑफ नेब्रास्काने सत्तरच्या दशकापासून ते आताच्याही अनेक मानसशास्त्रांच्या हवाल्याने रिसर्च केले आणि त्यांना आढळलं की, आता फॅमिली लॉ आल्याने बहुपती बेकायदेशीर झालं आहे. पण तिबेटच्या गावांमध्ये अजनूही हे सुरू आहे.

अशात प्रश्न असाही उपस्थित राहतो की, अनेक पती असल्याने त्यांच्यात तणाव राहत नसेल का? ते वेळेची वाटणी कसे करत असतील? याचं उत्तर मेवलिन गोल्डस्टेन यांच्या वेन ब्रदर्स शेअर ए वाइफ या लेखात मिळतं. त्यांनी अनेक वर्ष तिबेटमध्ये घालवली आणि तेथील समाजाला जवळून पाहिलं. त्यांनी लिहिलं की, तिबेटी समाजात सामान्यपणे लग्ने घरातील मोठे लोक ठरवतात. त्यामागचं कारण हे असतं की, त्यांच्यात जमिनीवरून वाद होऊ नये. यावर उपाय म्हणून ते बहुपती या प्रथेकडे बघतात. 

यांच्यात लग्नेही वेगळ्या पद्धतीने होतात. मधे मोठा भाई आणि होणारी नवरी बसलेली असते. त्यांच्या आजूबाजूला इतर लहान भाऊ बसलेले असतात. लग्नाचे सगळे रिवाज मोठ्या भावासोबत होतात. इतर भाऊ एकप्रकारे साक्षीदार म्हणून असतात. पण घरात नवरी आली की, ती सगळ्यांची पत्नी असते. अशात हेही ठरतं की, जर भावांपैकी कुणा एकाचा मृत्यू झाला तरी पत्नी एकटी राहणार नाही.

एकापेक्षा जास्त पती असले की, बरेच नाजूक प्रश्न सुद्धा उपस्थित होतात. जसे की, वेळेची विभागणी कशी होते किंवा मुलाबाबत कसं ठरतं की, तो कोणत्या वडिलांचा आहे? याबाबतही या लोकांनी काही उपाय शोधून काढले आहेत. ज्यात एक टोपी महत्वाची भूमिका बजावते. जेव्हा महिला एखाद्या पुरूषासोबत असते, तेव्हा रूमच्या बाहेर एक टोपी ठेवली जाते. जेणेकरून त्यांना समजावं. जर कुणी आत असेल तर इतर कुणीही आत जात नाही. 
त्यासोबतच या लग्नातून जन्माला आलेलं बाळ हे सगळे त्यांचं बाळ मानतात आणि त्यात कोणताही भेदभाव करत नाहीत. मुलाच्या खऱ्या वडिलाबाबत ना कुणी विचारत ना काही. 
 

Web Title: Tibetan community where several men share one wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.