प्रशासनाला जे जमलं नाही ते वाघानं करुन दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:52 PM2019-11-29T12:52:43+5:302019-11-29T12:53:16+5:30

देशातील गावांना हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण अजूनही लोक बाहेर शौचास जातात.

Tiger entered in Uttar pradesh's two village, people not going out for toilet | प्रशासनाला जे जमलं नाही ते वाघानं करुन दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त...

प्रशासनाला जे जमलं नाही ते वाघानं करुन दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त...

Next

देशातील गावांना हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण अजूनही लोक बाहेर शौचास जातात. म्हणजे अनेक ठिकाणी प्रशासन लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद करू शकलेले नाहीत. लोकांचीही बाहेर जाण्याची सवय सुटत नाहीये. पण हेच प्रशासनाचं काम एका वाघाने केलं आहे. वाघाने लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद केलंय. 

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडच्या महोबा आमि हमीरपूर जिल्ह्याच्या सीमेवर वाघ शिरलाय. त्यामुळे वाघाच्या भितीने या गावांमधील लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद झालं आहे. या गावांमध्ये सरकारने शौचालयेही बांधून दिले आहेत. तरी सुद्धा बाहेर नैसर्गिक विधीसाठी जात होते.
पण आता गावात अचानक एक वाघ शिरल्याने लोकांचं बाहेर जाणं बंद झालं आणि ते घरातील शौचालयाचा वापर करू लागले आहेत. हा वाघ मध्यप्रदेशातील पन्ना जंगलातून भटकून इतके आल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. 

(प्रातिनिधीक छायाचित्र)

येथील वन विभागाचे अधिकारी रामजी राय यांनी सांगितले की, कुनेहटा गावातील एका व्यक्तीने शेतात वाघ बघितल्याची सूचना मिळाली होती. त्यामुळे वन विभागाने एक टीम वाघ पकडण्यासाठी तैनात केली आहे. आता सुरक्षा म्हणून लोकांना आग पेटवून सतर्क राहण्याचा सूचना करण्यात आली आहे. 

(Image Credit : nationalgeographic.com) (प्रातिनिधीक छायाचित्र)

आतापर्यंत वाघाला पकडण्यात यश आलं नाही. पण निदान या वाघाच्या भितीने लोक शौचालयाचा वापर करू लागले ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. वाघ जंगलात असूनही लोक घरात लपून बसत आहेत. कुणीही बाहेर शौलास जात नाही. गेल्या चार दिवसांपासून लोक असंच करत आहेत. त्यामुळेच गमतीत या वाघाला हागणदारीमुक्त योजनेचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणत आहेत.


Web Title: Tiger entered in Uttar pradesh's two village, people not going out for toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.