'सकाळीच चीनहून आलोय...' असं मुलगा म्हणाला अन् संपूर्ण दिल्ली मेट्रो झाली रिकामी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:40 PM2020-03-04T16:40:08+5:302020-03-04T16:46:06+5:30
coronavirus : चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे.
टिकटॉक (TikTok)वर रोज नव-नवीन व्हिडीओ अपलोड होताना दिसतात. जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर टिकटॉक व्हिडीओ तयार होत आहेत, ते जास्त व्हायरल होत आहेत.
असाच एक व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) सीट मिळविण्यासाठी एका मुलाने अशी शक्कल लढविली की, संपूर्ण मेट्रोच रिकामी झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिले तर लक्षात येईल की एक मुलगा फोन वर बोलत आहे. तो म्हणतो, "सकाळीच चीनहून आलोय...". त्यानंतर लगेच त्या मुलाच्या आजू-बाजूला पाहिले तर मेट्रोतील संपूर्ण सीट रिकाम्या झाल्या होत्या.
@kapilkashyap628 what an idea sir g#@realfunnyvideos @tiktok ##trending##video #@1.million @theforyoupageoffical @tiktok_india
♬ original sound - VIKAS SHARMA
हा व्हिडीओ टिकटॉक क्रिएटर कपिल कश्यप याने शेअर केला असून 3.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 98 हजारहून अधिक लाइक्स आणि जवळपास 300 कमेंट्स या व्हिडीओला मिळाल्या आहेत. दरम्यान, चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत.
भारतात 25 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसबाबत माहिती दिली. आतापर्यंत फक्त 12 देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात होती. मात्र, यापुढे जगभरातील देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
याचबरोबर, चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(Coronavirus: मोबाईल वापरता? मग कोरोनापासून जरा जास्तच सावध राहा; कारण...)
(Coronavirus:भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प)
(कोरोनाच्या काळजीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!)