स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरचा दावा, २०२२ साली एक सेलिब्रिटी उघड करणार त्याच्या मृत्युचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 01:22 PM2022-03-17T13:22:20+5:302022-03-17T13:25:01+5:30
एका सेलिब्रिटीच्या मृत्यूचं (Celebrity death) रहस्य उलगडणार आहे, असा दावा एका स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने (self-proclaimed time traveller) केला आहे. त्याने २०२२ सालातील अनेक भविष्यवाणी केल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांत बऱ्याच सेलिब्रिटींचा मृत्यू झाला. याची कारणं वेगवेगळी होती. काही सेलिब्रिटींच्या संशयास्पद मृत्यू झाला, ज्यांची मृत्यू प्रकरणं बरेच महिने चर्चेत होती. आता अशाच एका सेलिब्रिटीच्या मृत्यूचं (Celebrity death) रहस्य उलगडणार आहे, असा दावा एका स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने (self-proclaimed time traveller) केला आहे. त्याने २०२२ सालातील अनेक भविष्यवाणी केल्या आहेत.
एका व्यक्तीने म्हटलं आहे आहे येणाऱ्या काळात घडणाऱ्या घटनांबाबत त्याला सर्वकाही माहिती आहे. या घटना कधी, कुठे आणि कशा घडणार आहेत याची कल्पना आपल्याला आहे. आपण २२३६ सालातून परत आलो आहोत. तोपर्यंत घडलेल्या सर्व घटना आपल्याला माहिती आहेत. २०२२ सालात अशा मोठ्या घटना घडणार आहेत, ज्याबाबत दुसऱ्या कुणालाच माहिती नाही. लवकरच एक बडा सेलिब्रिटी आपल्या मृत्यूच्या खोट्या नाटकावरून पडदा हटवणार आहे, असा दावा त्याने केला आहे.
सोशल मीडिया टिकटॉकवर त्याने आपला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने म्हटल आहे. मी खरंच एक टाइम ट्रॅव्हलर आहे, यावर काही लोकांना विश्वास नाही. त्यामुळे मी काही अशा घटनांबाबत सांगणार आहे, ज्या २०२२ सालात घडणार आहेत. १७ जून आतापर्यंतचा सर्वात मोठा समुद्री जीव प्रशांत महासागरात सापडेल. १६ सप्टेंबरला एक लोकप्रिय संगीतकार स्वतः समोर येऊन आपल्या मृत्यूबाबत सांगेल. आपण मृत्यूचं खोटं नाटक केलं हे स्वीकार करेल (Dead celebrity will come back in September). २०२२ च्या अखेर माणसांच्या कामांच्या जागेत रोबो आपली २० टक्के जागा मिळवतील. आता हे सर्व खरं होतं की नाही याकडे लक्ष लागलं आहे.
आता हा फेमस सेलिब्रिटी कोण असणार याबाबत जो तो आपले तर्कवितर्क लढवत आहेत. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार काहींच्या मते, तो मायकल जॅक्सन किंवा तुपैक शकूर असेल. तर एका युझरने म्हटलं, मी गेल्या वर्षी तुमच्या सर्व भविष्यवाणी लिहिल्या. ज्यात सप्टेंबर २०२१ मध्ये इतिहासातील सर्वात भीषण वादळ येणार असल्याचं म्हटलं होतं पण आतापर्यंत असं झालं नाही.
कित्येक टिकटॉक युझर्स असे आहेत, जे या टाइम ट्रॅव्हरच्या टिकटॉक अकाऊंटला फॉलो करत आहेत. ते म्हणाले की हा तथाकथित ट्राइम ट्रॅव्हलर जेव्हा त्याचे दावे खोटे ठरतात तेव्हा तो स्वतःचे व्हिडीओज अकाऊंटमधून डिलीट करतो. त्यामुळे या व्यक्तीच्या दाव्यात किती तथ्यता आहे माहिती नाही पण त्याने जे सांगितलं आहे, ते जाणून घेण्याची इच्छा, उत्सुकता प्रत्येकाला आहे.