२०२० मध्ये सुख, शांती हवी असेल तर 'या' वास्तुशास्त्राच्या टीप्स नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 04:51 PM2019-12-27T16:51:41+5:302019-12-27T17:46:03+5:30
२०१९ काही दिवसातच तुम्हाला टाटा-बायबाय करून जाणार आहे. तसंच नवीन वर्ष आपल्याला कसं जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
२०१९ काही दिवसातच तुम्हाला टाटा-बायबाय करून जाणार आहे. नवीन वर्ष आपल्याला कसं जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच जर काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर संपूर्ण वर्षभर तुम्ही आनंदात राहू शकता. तसंच आपल्या घरात ज्या पद्धतीचे वातावरण असते. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यावर सुध्दा त्याच गोष्टींचा परीणाम होत असतो. तर या सगळ्यात वास्तुशास्त्रसुद्धा महत्वाचं असतं.
येत्या नवीन वर्षात आनंद घेण्यासाठी जर तुम्ही काही वास्तुशास्त्रांचे नियम लक्षात घेऊन कृती केलीत तर तुम्हाला उद्भवत असणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. कारण जर आपलं घर चांगलं असेल तर तन, मन, धन व्यवस्थित राहतं असते. तसंच कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया घरातील वास्तूंची दिशा कशी असावी.
वास्तुशास्त्रानुसार घरात सुख आणि समृध्दिचे वातावरण असेल तर फायद्याचं असतं. तसंच घऱात येणारी सुखसमृध्दि ही मुख्य दरवाज्यातून येत असते. त्यामुळे घरातील मुख्य दरवाज्याला गणपतीचा फोटो किंवा हळद, कुंकू तसंच चंदनाने काढलेला स्वास्तिक असावा. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. घरातील स्वयंपाकघर ही अशी जागा असते. त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होत असतं. त्यामुळे नवीन वर्षात आपलं स्वयंपाकघर कसं टापटीप आणि स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करा. जर स्वयंपाकघर स्वच्छ नसेल किंवा त्याची साफसफाई केली नसेल तसंच दुरावस्था झाली असेल तर नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्या.
घरात किंवा बाल्कनीत झाडं लावण्याचा प्रयत्न करा. तसंच शक्य नसल्यास मनी प्लान्ट किंवा तुळस असे एखादे तरी झाडं लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन मिळेल. तसंच सकारात्मक उर्जा मिळेल.