घरातील काचेची भांडी चमकवण्यासाठी वापरा 'हे' सोपे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 01:41 PM2020-01-02T13:41:20+5:302020-01-02T13:41:27+5:30

काचेची भांडी प्रत्येकाच्याच घरात असतात.

Tips for clean and polish your glassware | घरातील काचेची भांडी चमकवण्यासाठी वापरा 'हे' सोपे उपाय 

घरातील काचेची भांडी चमकवण्यासाठी वापरा 'हे' सोपे उपाय 

googlenewsNext

काचेची भांडी प्रत्येकाच्याच घरात असतात. पण दिवसेंदिवस त्याच अवस्थेत पडून राहिल्यामुळे त्या भांड्यावर डाग पडतात. तसंच ती भांडी काही दिवसांपूर्वीच वापरात काढली असतील तरी ती जुनी दिसायला लागतात. तसंच ती भांडी कशाने साफ करता येतील याबाबत विचार सुरू असतो.  कारण जर घरी कोणी पाहूणे आले आणि काचेच्या भांड्यांवर डाग असतील तर  दिसायला खराब दिसत असतं. जर तुमच्या घरातील भांडी सुद्धा जर वापरून किंवा पडून राहून खराब झाली असतील तर तुम्ही घरच्याघरी अगदी सोप्या पध्दतीने या भांड्यांना स्वच्छ करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काचेच्या भांड्याना स्वच्छ कसं करायचं.

काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी त्यात बोरोक्स आणि पाण्यात घालून काहीवेळ ठेवा. नंतर त्या भांड्यांना साफ करा. असं केल्याने काचेच्या भांडयावर आलेले डाग निघून जातील.

काचेचे पाण्याचे ग्लास जर स्वच्छ करायचे असतील तर साबणाच्या गरम पाण्याचा वापर करा. तसंच या पाण्यात मीठ घालून सुद्धा तुम्ही वापर धुण्यासाठी करू शकता.  पण त्यासाठी गरम पाण्यात साबण घातल्यानंतर लगेच ते धुवू नका तर काहीवेळ पाण्यात मीठ टाकून बाजूला राहू द्या त्यानंतर  या पाण्याने भांडी धूवा. 

जर तुम्हाला काचेची भांडी स्वच्छ  चमकदार हवी असतील  तर तांदळाच्या पाण्यात काचेचे ग्लास भिजवून ठेवा. नंतर त्या ग्लासांना पाण्याने धुवा असं केल्यास ग्लास चमकदार दिसतील. काचेची भांडी धुण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू घाला किंवा लिंबाचे साल घातले तरी चालेल. 

(image credit- clenipedia)

अनेकदा काचेची भांडी स्वच्छ करत असताना हातातून पडून फुटण्याची शक्यता असते. म्हणून काचेचे ग्लास धुण्यासाठी  हातात जुना टॉवेल किंवा कोणताही कपडा वापरा. कारण कपड्याचा वापर केल्यास काचेची भांडी हातातून सटकायची भीती नसते. 

जर तुम्ही काचेची भांडी धुण्यासाठी साबणाऐवजी बेकिंग पावडरचा वापर केलात तर  भांडी अधिक चमकदार दिसतील. काचेची भांडी कधीही मोकळी ठेवू नका. त्यांना स्टॅण्डमध्ये किंवा कपाटात व्यवस्थीत लावून ठेवा.

Web Title: Tips for clean and polish your glassware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.